Kiara-Sidharth Daughter Name: कियारा–सिद्धार्थ यांनी शेअर केली आपल्या लाडक्या राजकुमारीची पहिली झलक; जाणून घ्या मुलीचं नाव

Kiara Advani Sidharth Malhotra Daughter Name: बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी अखेर आपल्या लहानग्या राजकुमारीच्या नावाचा खुलासा केला आहे. 15 जुलै 2025 रोजी मुंबईतील एका रुग्णालयात कियाराने मुलीला जन्म दिल्यानंतर, तिच्या नावाबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. आज कियाराने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर करत मुलीचं सुंदर नाव जाहीर केलं.
काय आहे राजकुमारीचं नाव?
कियाराने इंस्टाग्रामवर आपल्या मुलीच्या लहानशा, गोंडस पायांचा फोटो टाकत लिहिलं, “आमच्या प्रार्थनांतून आमच्या मिठीत आलेली… आमचा दैवी आशीर्वाद, आमची राजकुमारी सरायाह मल्होत्रा (Saraayah Malhotra).” यानुसार कियारा आणि सिद्धार्थ यांनी आपल्या मुलीचं नाव सरायाह मल्होत्रा ठेवलं असून, चाहत्यांकडून या पोस्टवर कमेंट्स आणि शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.
View this post on Instagram
सेलेब्सच्या शुभेच्छा
कियारा–सिद्धार्थ यांच्या या पोस्टवर अनेक बॉलिवूड सेलेब्सनी प्रेमाने प्रतिक्रिया दिल्या. शिल्पा शेट्टी यांनी “खूप सुंदर” असं म्हणत शुभेच्छा दिल्या. करण जोहर यांनी लिहिलं, “माझं प्रेम आणि आशीर्वाद कायम…” अथिया शेट्टी, वरुण धवन, मनीष मल्होत्रा, संजय कपूर यांसारख्या अनेकांनी हार्ट इमोजी टाकून कपलवर प्रेमाचा वर्षाव केला.
कियारा–सिद्धार्थ यांची प्रेमकहाणी
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांचा विवाह 7 फेब्रुवारी 2023 रोजी राजस्थानमधील जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये जल्लोषात पार पडला होता. त्यांच्या डेस्टिनेशन वेडिंगमध्ये केवळ जवळचे नातेवाईक आणि मित्र सहभागी झाले होते. लग्नानंतर मुंबईत त्यांनी भव्य रिसेप्शनही दिलेल.
2025 मध्ये कियाराने मुलीला जन्म दिल्यानंतर चाहत्यांना या छोट्या परीच्या नावाबद्दल प्रचंड उत्सुकता होती. आज ‘सरायाह मल्होत्रा’ या नावाच्या घोषणेनंतर सोशल मीडिया शुभेच्छांनी गजबजून गेला आहे. कियारा–सिद्धार्थ यांच्या कुटुंबात आलेल्या या आनंददायक क्षणाबद्दल चाहत्यांनी मोठ्या उत्साहात शुभेच्छा दिल्या आहेत.




