अभिनेत्री परिणीती चोप्राही देणार ‘गुडन्यूज’! बेबी बंपसोबत पहिल्यांदाच शेअर केला व्हिडीओ

Parineeti Chopra : अभिनेत्री परिणीती चोप्रा बॅालिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने अभिनेता अर्जून कपूर याच्यासोबत ‘इशकझादे’ या सिनेमातून बॅालिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमामुळे तिला मोठी प्रसिद्ध मिळाली. त्यानंतर ती अनेक बॅालिवूड सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. बॅालिवूडमध्ये काम करत असतानाच तिने खासदार राघव चड्डा यांच्यासोबत लग्न केलं. आठ महिन्यानंतर परिणीतीने तिच्या यू ट्यूब चॅनेलवर एक मजेशीर व्हॅागिंग व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत परिणीतीने पहिल्यांदाच तिचा बेबी बंप दाखवला आहे.
परिणीती चोप्रा तिच्या गरोदरपणाची घोषणा केल्यानंतर पहिल्यांदाच बेबी बंपमध्ये दिसल्याने तिच्या चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या व्हिडीओत तिचा प्रेग्नेंसी ग्लो आणि गोंडस बेबी बंप स्पष्टपणे दिसत आहे. या व्हिडीओत परिणीती व्लॉगिंग करताना पॉडकास्ट वापरून पाहताना आणि स्वयंपाक करत मजा करताना दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून परिणीती तिच्या गरोदरपणातील छोटे छोटे क्षण सोशल मीडियावर शेअर करत आहे. काही दिवसांपूर्वी तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये तिने या दिवसांत तिला कोणत्या प्रकारच्या इच्छा होत आहेत याविषयी सांगतलं होतं.
View this post on Instagram
या पोस्टमध्ये तिने टोमॅटो सूप आणि चीज टोस्टचा फोटो शेअर केला होता. या फोटोला तिने कधीकधी मला रात्रीच्या जेवणासाठी फक्त टोमॅटो सूप आणि चीज टोस्ट हवा असतो… आणि मला कोणीही थांबवू शकत नाही, असं कॅप्शमध्ये लिहिलं होतं. तिने केलेल्या पोस्टवर चाहत्यांनी कमेट्सं केल्या होत्या. आता हे स्पष्ट झालं आहे की परिणीती तिच्या गरोदरपणाचा मनमुक्त आनंद घेत आहे आणि तिच्या चाहत्यांना प्रत्येक अपडेटसह सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत आहे.
हेही वाचा : आझम खान यांची तुरुंगातून सुटका ; किती दिवस राहणार बाहेर? वाचा सविस्तर





