Sonakshi Sinha : सोनाक्षीचा रौद्रवतार! जटाधारा सिनेमाचा टीझर रिलीज

Sonakshi Sinha : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता सुधीर बाबू यांच्या बहुप्रतिक्षित ‘जटाधारा’ या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. या टीझरमध्ये सोनाक्षीच्या जटाधारी अवताराने प्रेक्षकांना अचंबित केलं आहे. या सिनेमातून पहिल्यांदाच सोनाक्षी देवीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा पौराणिक कथेवर आधारित आहे. या टीझरला चांगला प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला आहे.
सोनाक्षी सिन्हाच्या आगामी ‘जटधारा’ सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर प्रेक्षकांची उत्सुकता जास्त न ताणता या सिनेमाच्या निर्मात्यांनी सिनेमाचा टीझर रिलीज केला आहे. या सिनेमाच्या टीझरमध्ये सोनाक्षी एका भयंकर जटाधारी अवतारात दिसत आहे. तिच्या या लूकने तिने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
View this post on Instagram
अभिनेत्रीच्या कपाळावर लाल तिलक, डोक्यावर मुकुट, गळ्यात भरगच्च दागिने आणि हातात तलवार धरलेली दिसत आहे. ती रागाच्या भरात तिच्या शत्रूंवर हल्ला करतानाही दिसते. याशिवाय या सिनेमात अभिनेता सुधीर बाबू असून त्याचाही लूक दमदार पद्धतीने दाखवण्यात आला आहे. टीझरमध्ये अभिनेता शिवभक्ताच्या भूमिकेत दिसत आहे.
त्याच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ आणि कपाळावर तिलक आहे. यासोबतच तो सोनाक्षी सिन्हाच्या पात्राशी त्रिशूळ घेऊन लढताना दिसतोय. यामुळे या सिनेमाची कथा उत्तम असणार असं प्रेक्षकांना वाटत आहे.





