sonakshi sinha : “हिंदू नाही तर भारतीय म्हणून…”; सोनाक्षीची लक्षवेधी पोस्ट चर्चेत, थेट म्हणाली….

sonakshi sinha : मंगळवारी 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाममधील बैसारन मेदानावर दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात 25 भारतीय आणि एका नेपाळी नागरिकासह 26 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. 2019 च्या पुलवामा हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील हा सर्वात भीषण हल्ला मानला जात आहे.
या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या सीमापार दहशतवादाला पाठिंबा देण्याच्या भूमिकेविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीच्या बैठकीत, गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत, पाकिस्तानने सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणे पूर्णपणे थांबवत नाही तोपर्यंत 1960 चा सिंधू जल करार निलंबित ठेवण्याचा आणि अटारी चेक पोस्ट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ माजली असून दहशतवाद्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा आहे. या हल्ल्याबद्दल सर्वजण शोक व्यक्त करत आहेत. दरम्यान, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने देखील या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे.
View this post on Instagram
सोनाक्षी म्हणाली, ‘हा फक्त आणि फक्त द्वेष पसरवण्याचा कट आहे. दहशतवाद्यांचा उद्देश केवळ लोकांना मारणे नव्हता तर लोकांमध्ये अविश्वास निर्माण करणे देखील होता. त्यांचे उद्दिष्ट हिंदू विरुद्ध मुस्लिमांना उभे करणे आणि समुदायांमध्ये फूट पाडणे आहे. हा दहशतवाद्यांचा सुनियोजित कट आहे.
भारतीय म्हणून शोक करण्याऐवजी, आपल्याला हिंदू म्हणून शोक करण्यास सांगितलं जात आहे. भारतीय म्हणून एकत्र येण्याऐवजी, दहशतवाद्यांनी आपल्याला धर्माच्या आधारावर फूट पाडण्यास प्रवृत्त केलं आहे.’ असं अभिनेत्री म्हणाली असून सध्या सर्वत्र सोनाक्षीची पोस्ट व्हायरल होत आहे.
शत्रुघ्न सिन्हा चांगलेच भडकले, पाहा..
जेव्हा पत्रकार शत्रुघ्न सिन्हा यांना पहलगाम हल्ल्याबद्दल प्रश्न विचारतो, तेव्हा ते त्याच्यावर भडकताना दिसत आहेत. त्याचसोबत त्यांनी या घटनेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ‘प्रोपोगंडा वॉर’ (प्रचारकी युद्ध) म्हटलंय. व्हायरल व्हिडीओमध्ये शत्रुघ्न सिन्हा आधी विचारतात, “काय घटना घडली आहे?” त्यावर पत्रकार त्यांना सांगतो, “तिथे हिंदूंवर…” हे ऐकताच शत्रुघ्न त्याच्यावर भडकतात आणि म्हणतात,
View this post on Instagram
“हिंदू हिंदू काय म्हणताय? तिथे हिंदू-मुस्लीम सर्व भारतीय आहेत. ही गोदी मीडिया प्रमाणापेक्षा जास्तच चालवतेय. आमचे मित्र माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या गटाकडून हे प्रचारकी युद्ध जास्तच चालवलं जातंय. हे अती होतंय.
हा मुद्दा संवेदनशील आहे हे मला मान्य आहे. त्याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. आपण असं कोणतंच वक्तव्य करू नये किंवा काही करू नये, ज्यामुळे तणाव आणखी वाढेल. सध्या जखमींवर औषधोपचाराची गरज आहे.” असं ते बोलताना दिसतात.





