Namdeo Dhasal Biopic : नामदेव ढसाळ यांचा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर; लोकप्रिय अभिनेता साकारणार भूमिका
Namdeo Dhasal Biopic : या चित्रपटाच्या लेखनाची आणि दिग्दर्शनाची धुरा वरुणा राणा यांनी सांभाळली

Namdeo Dhasal Biopic : अभिनेता ललित प्रभाकर एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दलित पँथर आणि विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित ‘ढसाळ’ या चरित्रपटात ललित झळकणार आहे. याद्वारे आता मोठ्या पडद्यावर नामदेव ढसाळ यांचा जीवनप्रवास पाहायला मिळणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमधून त्याचा चित्रपटातील प्रभावी लूकसुद्धा पाहायला मिळतोय.
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती’ निमित्ताने या चित्रपटाचे भव्य पोस्टर प्रदर्शित झाले. नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित ‘ढसाळ’ या चरित्रपटाची तारीखसुद्धा जाहीर झाली आहे. येत्या १ ऑक्टोबर २०२६ रोजी हा चरित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. मराठी आणि हिंदी भाषेत हा चरित्रपट प्रदर्शित होणार आहे. Namdeo Dhasal Biopic
View this post on Instagram
ललितनेसुद्धा सोशल मीडियावर चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टला त्याने “सर्वसामान्य माणसाला सत्तासंपत्तिप्रतिष्ठा यांपासून वंचित ठेवणाऱ्या शोषणव्यवस्थेला सुरुंग लावणाऱ्या तमाम छोट्या मोठ्या चळवळींना. प्रवृत्तींना अर्पण. – पद्मश्री नामदेव ढसाळ” अशी कॅप्शन दिली आहे.Namdeo Dhasal Biopic
या चित्रपटाच्या लेखनाची आणि दिग्दर्शनाची धुरा वरुणा राणा यांनी सांभाळली आहे. तसेच या चित्रपटाला दिग्गज संगीतकार इल्लैयाराजा यांचे संगीत लाभले आहे. हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार इर्शाद कामील आणि मराठीतील गुरु ठाकूर यांनी या चित्रपटाची गाणी लिहिली आहेत.
हेही वाचा:





