मुंबई – अभिनेता अक्षय कुमारचा ‘ओह माय गॉड 2’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होण्यापूर्वी अक्षयने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओद्वारे त्याने टीझरच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. येत्या 11 जुलै रोजी ‘ओएमजी 2’चा टीझर प्रदर्शित होणार असून या चित्रपटातून अक्षय कुमारचा नवा लूक समोर आला आहे, जो चाहत्यांना खूप आवडला आहे.
अक्षय कुमारने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो भगवान शिवाच्या रुपात दिसत आहे. त्याचा लुक इतका जबरदस्त आहे की यूजर्स त्याचे कौतुक करताना दिसत आहेत. यासोबतच या चित्रपटात सनातनची खिल्ली उडवू नये, असे आवाहनही अक्षय कुमारला करत आहे. नवीन लूकमध्ये अक्षय कुमार कपाळावर भस्म लावताना, गळ्यात रुद्राक्षाची माळ धारण करताना आणि जटाधारी धारण करताना दिसत आहे.
अक्षय कुमारचा हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारशिवाय यामी गौतम देखील दिसणार आहे. दरम्यान, अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा ‘गदर 2’ चित्रपटही याच दिवशी प्रदर्शित होणार आहे. अक्षय आणि सनी देओलमध्ये बॉक्स ऑफिसवर मोठी टक्कर पाहायला मिळणार आहे.