Solaris Cup National Tennis Tournament : डॉ. अजित पेंढारकर उपांत्यपूर्व फेरीत…

पुणे – सोलारीस क्लब तर्फे आयोजित दहाव्या सोलारीस करंडक जीएसटीए वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय टेनिस २०२४ स्पर्धेच्या ७० वर्षावरील गटात महाराष्ट्राच्या अजित पेंढारकर, लक्ष्मण अंबूळकर यांच्यासह तेलंगणाच्या ए.आर. राव, गुजरातच्या महेंद्र कक्कड, दिलीप देसाई आणि राजस्थानच्या राजेंद्र राठोड या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्यपुर्व फेरी गाठली.
मयुर कॉलनी येथील सोलारीस क्लब येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या मुख्य ड्रॉ फेरीच्या ७० वर्षावरील गटाच्या सामन्यात अग्रमानांकित आणि हैद्राबादच्या ए.आर. राव यांनी बारामतीच्या प्रदीप कूंचर यांचा ६-३, ६-२ असा पराभव केला. गुजरातच्या आणि पाचव्या मानांकित महेंद्र कक्कड यांनी पुण्याच्या आणि आठव्या मानांकित अनिल सौंदट्टीकर याचा ६-४, ६-४ असा पराभव केला.
BWF Malaysia Open 2024 : किदाम्बी श्रीकांतची दुसऱ्या फेरीत धडक…
नाशिकच्या आणि नवव्या मानांकित लक्ष्मण अंबूळकर याने ठाणेच्या प्रविण कुलथे याचा ६-१, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. गुजरातच्या दिलीप देसाई मुंबईच्या हंसराज पाटील याचा ६-१, ६-० असा सहज पराभव केला. चौथ्या मानांकित आणि मुंबईच्या अजित पेंढारकर यांनी अहमदनगरच्या मोहन थोलर यांचा ६-०, ६-१ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. जोधपूरच्या राजेंद्र राठोड यांनी पुण्याच्या डी.बी. सुमंत यांचा ६-०, ६-० असा सहज पराभव केला.





