Jitendra Awad : सोलापूरकर शब्द मागे घे, नाही तर मी तुला झोडणार; ‘त्या’ विधानाने जितेंद्र आव्हाड संतापले

मुंबई : अभिनेता राहुल सोलापूरकर याने काही दिवसांपूर्वीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. या एका विधानाने सोलापूरकर हा टीकेचा धनी ठरला होता. त्याच्या या वक्तव्यावरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं होतं. औरंगजेबाच्या तावडीतून सुटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी लाच दिली होती, असं विधान अभिनेता राहुल सोलापूरकर याने केलं होतं.
दरम्यान, हा वाद ताजा असतानाच आता राहुल सोलापूरकर याने आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे. वेदांनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मणच होते, असं ते म्हटले आहेत. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी ट्विट करत सोलापूरकरच्या या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
राहुल सोलापूरकरने आता सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. हा जिथे दिसेल तिथेच त्याला जोड्याने मारायला हवा. याच्यासारख्या मनुवाद्यांनीच महाराष्ट्राचे , देशाचे वाटोळे केले आहे. राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितलेली नाही. आता तर डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत बोलून सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत.
याच्या डोक्यावर नसलेले केस उगवावे लागतील; ते कसे उगवायचे, ते बहुजन अन् आंबेडकरवादी ठरवतील. या मनुवाद्यांनाच छत्रपती शिवाजी महाराज आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा का त्रास होतो, हेच समजत नाही. याला दिसेल तिथे तुडवा !! असं ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी राहुल सोलापूरकर यांना इशारा दिला आहे.
‘एवढंच नाही तर सोलापूरकर तुम्ही जिथे असाल तुम्ही बाबासाहेबांना आरेतुरे बोलतात? आम्ही म्हणतो ते आमचे बाप आहेत. तु म्हणशील का ते माझे बाप आहेत. अरे तुला एवढं बोलण्याचं स्वातंत्र्य बाबासाहेबांनी दिलं. गप्प आपले शब्द मागे घे, नाहीतर कोणी नाही मारलं तरी चालेलं पण मी तुला झोडणार, मी तुला मारणार बाबासाहेबांचा आणि शिवरायांचा अपमान आम्ही नाही सहन करणार, असंही जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.
राहुल सोलापूरकरने आता सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. हा जिथे दिसेल तिथेच त्याला जोड्याने मारायला हवा. याच्यासारख्या मनुवाद्यांनीच महाराष्ट्राचे , देशाचे वाटोळे केले आहे. राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितलेली नाही. आता तर डाॅ… pic.twitter.com/DHfhVgohqe
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 9, 2025
राहुल सोलापूरकरचे तोंड चपलीने फोडा : शरद कोळी
शिवसेना ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी देखील या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, राहुल सोलापूरकरचे तोंड चपलीने फोडा आणि एक लाख बक्षीस मिळवा, अशी घोषणा शरद कोळी यांनी केली आहे. शिवराय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या सोलापूरकरला फोडून काढा, असंही शरद कोळी म्हणाले.
काय म्हणाले राहुल सोलापूरकर?
रामजी सकपाळ नावाच्या या एका बहुजना घरात जन्माला आलेले भीमराव जो आंबेडकर नावाच्या गुरुजीकडून दत्तक घेतला जातो आणि त्यांचेच नाव पुढं वापरतो. तो भीमराव प्रचंड अभ्यास केल्याने वेदां म्हटल्या प्रमाणे आपल्या अभ्यासाने ब्राह्मण ठरतो, असे वक्तव्य राहुल सोलापूरकर यांनी केले.
सचिन खरातांनी राहुल सोलापूरकर यांना दिला इशारा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना दत्तक घेतलं म्हणणाऱ्या राहुल सोलापूरकर यांनी माफी मागावी, अन्यथा तोंडाला काळे फासू, असा इशारा रिपाइं खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी दिला आहे. राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखती दरम्यान बोलताना म्हणाले डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक घेतलं आणि वेदानुसार बाबासाहेब ब्राम्हण ठरतात हे विधान अत्यंत निषेधार्थ वक्तव्य केलं असल्याचे खरात यांनी म्हटले.





