Pune : सोलापूकरांच्या ‘त्या’ वादग्रस्त विधानांवर पुणे पोलीस आयुक्तांच मोठं विधान; नेमकं काय म्हणाले अमितेश कुमार?

Updated On:
Pune : सोलापूकरांच्या ‘त्या’ वादग्रस्त विधानांवर पुणे पोलीस आयुक्तांच मोठं विधान; नेमकं काय म्हणाले अमितेश कुमार?

पुणेः गेल्या काही दिवसांपासून अभिनेते राहुल सोलापूरकर हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहेत. दहा दिवसांपूर्वी सोलापूरकर यांचा छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेला जुना वादग्रस्त व्हिडिओ समोर आला होता. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली आग्र्याहून लाच देऊन सुटका केल्याचे वादग्रस्त विधान केले होते.

त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. यावर अनेकांनी सोलापूरकरांचे विधान अत्यंत चुकीचे होते, असे म्हटले तर त्यांच्या या विधानावर अनेकांकडून निषेध नोंदवत आला. हे सगळ सुरू असतानाच नुकताच त्यांच्या डॅा. बाबासाहेब यांच्यावर वादग्रस्त विधान केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.

यानंतर सोलापूरकर यांच्यावर चौहबाजूंनी टीका करण्यात येत आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. आता या प्रकरणावर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठं विधान केलं आहे. अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या दोन व्हिडिओची तपासणी पोलिसांनी केली आहे.

सोलापूरकरांच्या त्या व्हिडिओत गुन्ह्याचा उद्देश प्रथमदर्शनी दिसत नसल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यामध्ये गुन्हा दाखल करावा असे आक्षेपार्ह काहीही आढळून आले नाही, अशी माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली. या प्रकरणी कोणी काय म्हणतंय यावर आम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही, तर सध्या तरी राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पुरावे उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले.

….म्हणून पोलीस बंदोबस्तात वाढ

राहुल सोलापूरकर यांच्या पुण्यातील कोथरूड परिसरात असलेल्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढण्यात आला आहे. नुकतेच डॅा. बाबासाहेब आंबेडकरांवर केलेले वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर भीम अनुयायी चांगलेचं आक्रमक झाल्याचे पाहिला मिळाले. सोलापूरकर यांच्या घराबाहेर असलेले बॅरिगेटिंक बाजूला करत घरात घुसण्याचा प्रयत्न आंदोलनकांकडून करण्यात आला होता. यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये, तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, त्यामुळे सोलापूरकर यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026 : मराठवाड्यातील प्रवाशांसाठी मोठी खुशखबर; पहिल्यांदाच धावणार ‘ही’ स्पेशल ट्रेन, संपूर्ण वेळापत्रक पाहा

2026-09-09 18:49:09

Ganeshotsav 2026 : मराठवाड्यातील प्रवाशांसाठी मोठी खुशखबर; पहिल्यांदाच धावणार ‘ही’ स्पेशल ट्रेन, संपूर्ण वेळापत्रक पाहा

Pune News : धक्कादायक ! पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीची आत्महत्या

2026-09-09 17:46:05

Pune News : धक्कादायक ! पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीची आत्महत्या

coaching classes: प्रस्‍तावित कायद्याला नाही, जाचक अटींना विरोध

2026-09-09 07:52:42

coaching classes: प्रस्‍तावित कायद्याला नाही, जाचक अटींना विरोध

PMRDA: पीएमआरडीएला टाळे ठोकण्याची वेळ

2026-09-09 07:48:08

PMRDA: पीएमआरडीएला टाळे ठोकण्याची वेळ

Purandar Airport: महिनाअखेरपर्यंत ८० टक्के जमिनीचा ताबा

2026-09-09 07:44:15

Purandar Airport: महिनाअखेरपर्यंत ८० टक्के जमिनीचा ताबा