महिलांच्या आयपीएल स्पर्धेत प्रचंड गाजावाजा करत झालेल्या खेळाडूंच्या लिलावात भारताची स्टार महिला फलंदाज स्मृती मानधना हिला रॉयल चॅलंजर बंगळुरुने (आरसीबी) तब्बल 3.40 कोटी इतकी मोठी रक्कम देत आपल्या संघात घेतले. मात्र, या व्यावहारात बंगळुरुचे हात चांगलेच पोळले आहेत. स्मृतीच्या समावेशाने अन्य संघांच लिलावाकडे गंमतीने पाहात असलेल्या आरसीबीच्या संघ मालकांना आता स्मृतीला इतकी रक्कम देउन आपण संघात का घेतले याची डोकेदुखी सुरु झाली असेल. महिलांच्या आयपीएल स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष आहे, त्यातच खूप मोठ्या सोहळ्याद्वारे खेळाडूंचे लिलावही करण्यात आले. त्यात नॅशनल क्रश अशी ओळख असलेल्या मानधनाला आपल्या संघात घेण्यासाठी चुरस रंगली नसती तरच नवल. पण या स्पर्धेतून मुंबऊ इंडियन्ससह अनेक संघांना माघार घेतली व अखेर आरसीबीने तिला 3.40 कोटी इतक्या मोठ्या रकमेचा करार दिला व आपल्या संघात घेतले. परंतू बंगळुरु संघाला एलिमिटेर फेरीही गाछता आली नाही. त्यांची या स्पर्धेतील वाटचाल अत्यंत सुमार होती. त्यांच्या पुरुष संघाची आयपीएल स्पर्धेत जी स्थिती आहे त्याच रस्त्यावर त्यांच्या महिला संघाचाही प्रवास सुरु आहे. यंदाच्या स्पर्धेत बंगळुरुला बाद फेरी म्हणजेच थेट अंतिम फेरी किंवा एलिमिनेटर फेरीही गाठता आली नाही. या स्पर्धेत बंगळुरुने एकूण 8 सामने खेळले त्यात केवळ 2 सामनेच त्यांना जिंकता आले तर तब्बल 6 सामने गमवावे लागले. त्यांच्या खात्यात अवघे 4 गुण जमा झाले. याच सुमार कामगिरीमुळे त्यांचे यंदाच्या स्पर्धेतून आव्हानही संपले आहे. या आठही सामन्यात मानधनाने 35, 23, 18, 4, 8, 0, 37 व 24 अशा धावा केल्या आहेत. संघाची कर्णधार म्हणून ना तीची नेतृत्वगुण या स्पर्धेत दिसले किंवा तीच्यातील ती जिद्दी फलंदाजही दिसली नाही. त्यामुळे बंगळुरुला थेट अंतिम फेरी तर सोडाच परंतू एलिमिनेटरमध्येही प्रवेश करता आला नाही. या सुमार कामगिरीचे कारण केवळ मानधनाचे अपयशच आहे असे नाही तर त्यांची कामगिरी सांघिक स्तरावरही सुमार झाली. ODI World Cup 2023 : विश्वकरंडक रंगणार भारतातील ‘या’ 12 शहरांत; पुण्याला डावलले तर अंतिम सामना नरेंद्र मोदी… आता या स्पर्धेतून बोध घेत पुढील स्पर्धेत तरी मानधनासह सगळ्यांची कामगिरी सरस होइल अशी अपेक्षा आहे. मानधनाला घेत डोकेदुखी वाढवणारा आरसीबी संघ पुढील मौसमातही तिलाच कर्णदारपदी व संघात ठेवेल का तिला रीलीज करेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.