Aryaman Birla : राजस्थान रॉयल्सचा माजी खेळाडू बनला RCB चा नवा मालक! वयाच्या २२ व्या वर्षी सोडलं होतं क्रिकेट, जाणून घ्या कोण आहे?
Aryaman Birla : प्रसिद्ध उद्योगपती आर्यमन बिर्ला यांनी १६,७०० कोटी रुपयांहून अधिक बोली लावत आरसीबी फ्रँचायझी खरेदी केली आहे.

Aryaman Birla RCB new Owner and chairman : आरसीबीला आता नवा मालक आणि नवा चेअरमन मिळाला असून, प्रसिद्ध उद्योगपती आर्यमन बिर्ला यांनी १६,७०६ कोटी रुपयांची बोली लावत ही फ्रँचायझी खरेदी केली आहे. विशेष म्हणजे, आरसीबीचे चेअरमन होण्यापूर्वी आर्यमन स्वतः एक क्रिकेटपटू म्हणून या लीगचा भाग राहिले आहेत.
आयपीएल २०२६ च्या हंगामापूर्वी आरसीबीच्या मालकी हक्कांमध्ये मोठा बदल झाला आहे. बिर्ला समूहाचे वारसदार आर्यमन बिर्ला यांनी ही टीम विकत घेतली आहे. ज्या वयात अनेक खेळाडूंचे करिअर सुरू होते, त्याच २२ व्या वर्षी क्रिकेटला रामराम ठोकणारा हा तरुण आता आयपीएलमधील सर्वात लोकप्रिय संघाचा सर्वेसर्वा बनला आहे. त्याबद्दल जाणून घेऊया.
२२ व्या वर्षी निवृत्ती का घेतली?
🚨 ARYAMAN BIRLA – THE NEW CHAIR OF RCB 🚨 pic.twitter.com/ZZRywhDdgi
— Johns. (@CricCrazyJohns) March 24, 2026
आर्यमन बिर्ला यांनी २०१९ मध्ये अचानक क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेण्याची घोषणा केली होती. याचे मुख्य कारण मानसिक आरोग्य (Mental Health) हे होते. “मला माझ्या मानसिक स्वास्थ्याला प्राधान्य द्यायचे आहे,” असे म्हणत त्यांनी मैदानाचा निरोप घेतला. या ब्रेकनंतर ते पुन्हा कधीही व्यावसायिक क्रिकेटकडे वळले नाहीत आणि आता थेट संघाचे मालक म्हणून समोर आले आहेत.
राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये एन्ट्री –
Aryaman Birla in 2018 – Part of Rajasthan Royals franchise as Player.
Aryaman Birla in 2026 – Chair of Royal Challengers Bengaluru. [TOI] pic.twitter.com/khVsDLejYE
— Johns. (@CricCrazyJohns) March 24, 2026
मालक बनण्यापूर्वी आर्यमन एक खेळाडू म्हणून आयपीएलचा भाग होते. २०१८ च्या लिलावात राजस्थान रॉयल्सने त्यांना ३० लाख रुपयांना खरेदी केले होते. मात्र, त्यांना एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यांनी मध्य प्रदेशसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. ९ प्रथम श्रेणी सामन्यांत त्यांनी ४१४ धावा केल्या असून त्यात एका शतकाचा समावेश आहे. मात्र, लिस्ट-ए क्रिकेटमध्ये ४ सामन्यांत त्यांना केवळ ३६ धावाच करता आल्या होत्या.
हेही वाचा – Cricket News : खळबळजनक ! ‘या’ 2 दिग्गज क्रिकेटपटूंना जीवे मारण्याची धमकी
आता क्रिकेटच्या मैदानावरील अनुभवानंतर आर्यमन बिर्ला आरसीबीचे नवे चेअरमन म्हणून कोणती रणनीती आखतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. १६,७०६ कोटींची ही मोठी गुंतवणूक आरसीबीला पहिले जेतेपद मिळवून देणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.





