Smriti Palash Patch Up : स्मृती-पलाश पुन्हा एकत्र येणार? मुंबईतील ‘त्या’ व्हिडिओमुळे लग्नाच्या चर्चांना उधाण; वडिलांच्या कृतीने वेधलं लक्ष
Smriti Palash Patch Up : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पलक मुच्छल आणि श्रीनिवास मानधना यांच्या एका व्हिडिओने चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे.

Smriti Palash Patch up Rumors after Video Viral : स्टार फलंदाज स्मृती मंधाना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्यातील नाते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये लग्नाच्या आदल्या रात्री मोडलेले हे नाते आता पुन्हा जुळण्याची चिन्हे दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाची जय्यत तयारी झाली होती, परंतु ऐनवेळी हे लग्न मोडल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. पलाशने स्मृतीची फसवणूक केल्याच्या आरोपांमुळे हे नाते संपुष्टात आल्याचे बोलले जात होते. मात्र, आता एका व्हायरल व्हिडिओने या कडू आठवणी मागे सारल्याचे संकेत दिले आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये काय आहे?
View this post on Instagram
सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मंधाना हे पलाशची बहीण आणि प्रसिद्ध गायिका पलक मुच्छल सोबत दिसत आहेत. मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर हा प्रसंग घडला. यामध्ये पलक स्मृतीच्या वडिलांच्या पाया पडताना आणि ते तिला आशीर्वाद देताना दिसत आहेत.
दोन्ही कुटुंबांमधील हा जिव्हाळा पाहून युजर्सना आश्चर्याचा धक्का बसला असून, स्मृती आणि पलाशचे पॅच-अप झाल्याचे तर्क लावले जात आहेत. आता हा व्हिडिओ जुना आहे की नवा, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. तरीही, मानधना आणि मुच्छल कुटुंबीयांना एकत्र पाहून “पलाशला दुसरी संधी दिल्याबद्दल स्मृती तुझे आभार” अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
फसवणुकीच्या आरोपांमुळे तुटलं होतं लग्न –
२५ नोव्हेंबर २०२५ रोजी या जोडीचे लग्न होणार होते. परंतु, पलाशचे इतर महिलांशी संबंध असल्याचा संशय स्मृतीला आल्याने लग्नाच्या काही तास आधी हे नाते तुटल्याची चर्चा होती. त्यावेळी पलाशला प्रचंड ट्रोल करण्यात आले होते, तर स्मृतीला चाहत्यांनी मोठी सहानुभूती दिली होती. या गंभीर विषयावर स्मृतीने आजही अधिकृत मौन बाळगले आहे.





