IND W vs SA W : स्मृती मंधानाने वनडेत रचला इतिहास! षटकार ठोकत मोडला २८ वर्षांचा विश्वविक्रम

Smriti Mandhana break Belinda Clarke Record : भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या आयसीसी वनडे विश्वचषक २०२५ मधील आपला तिसरा सामना विशाखापट्टणम येथील मैदानावर खेळत आहे. या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहे. या सामन्यात भारताची स्टार सलामीवीर स्मृती मंधाना हिने २८ वर्ष जुना मोठा विक्रम मोडला आहे. स्मृती आता एका कॅलेंडर वर्षात महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली आहे.
ऑस्ट्रेलियन खेळाडूचा मोडला विक्रम –
महिला वनडे क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडू बेलिंडा क्लार्कच्या नावावर होता. तिने १९९७ मध्ये एकूण ९७० धावा केल्या होत्या. स्मृतीला हा विक्रम मोडण्यासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात फक्त १२ धावांची गरज होती. स्मृतीने षटकार ठोकत हा विक्रम मोडला. २०२५ मध्ये स्मृतीने वनडे फॉरमॅटमध्ये एकूण ९८२ धावा केल्या आहेत. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात ती ३२ चेंडूत २३ धावा करून बाद झाली. आता जर स्मृता पुढील सामन्यात आणखी १८ धावा केल्या, तर ती महिला वनडे क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात १,००० धावा पूर्ण करणारी पहिली खेळाडू ठरेल.
A shimmy down the track and smashed straight over the bowlers head! 🤩
What a shot to break #BelindaClark‘s record for the most runs in a year in W-ODIs. Take a bow, #SmritiMandhana. 🎯
Catch the LIVE action ➡ https://t.co/qUAtuPmsC2#CWC25 👉 #INDvSA | LIVE NOW on Star… pic.twitter.com/cA766098a4
— Star Sports (@StarSportsIndia) October 9, 2025
महिला वनडेत एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडू:
- स्मृती मंधाना: ९८२ धावा
- बेलिंडा क्लार्क: ९७० धावा
- लॉरा वोल्वाडट: ८८२ धावा
- डेबी हॉकले: ८८० धावा
- एमी सॅटरथवेट: ८५३ धावा
हेही वाचा – Shubman Gill : रोहित-विराट आगामी एकदिवसीय विश्वचषकात खेळणार का? गिलने दिलं स्पष्ट उत्तर
विश्वचषकात स्मृतीने फलंदाजीत केले निराश –
🚨 SMRITI MANDHANA BROKE 28 YEAR OLD RECORD IN ODIs 🚨
– Smriti has most runs in a Calendar year in ODI History. 🇮🇳
The Queen of Indian Cricket.#TeamIndia #SmritiMandhana pic.twitter.com/SpAjjc3uft
— Indian Women Cricket | WPL #WPL2026 (@BCCIWomenLIVE) October 9, 2025
भारतीय संघाची सलामीवीर स्मृती मंधानाने विश्वचषकापूर्वी वनडे स्वरूपात उत्कृष्ट फॉर्म दाखवला होता. तिने १४ डावांमध्ये सुमारे ६६ च्या सरासरीने ९२८ धावा केल्या होत्या. परंतु, विश्वचषकात आतापर्यंत तीन डावांमध्ये तिला फारशी चमक दाखवता आलेली नाही. तिने या विश्वचषकात केवळ १८ च्या सरासरीने ५४ धावा केल्या असून तिचा स्ट्राइक रेट ७२.९७ आहे.





