SLC NOC : “आधी परीक्षा, मग आयपीएल! श्रीलंकन बोर्डाचा कडक फतवा; पथिराणा-हसरंगामुळे ‘या’ संघांच्या वाढल्या अडचणी
SLC NOC : श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (SLC) आपल्या खेळाडूंसाठी 'फिटनेस टेस्ट' अनिवार्य केली असून, यामुळे आयपीएल फ्रँचायझींचे टेन्शन वाढले आहे.

SLC NOC Matheesha Pathirana Injury Update IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज असलेल्या श्रीलंकन खेळाडूंना आता आपल्या बोर्डाच्या कडक नियमांना सामोरे जावे लागणार आहे. “आधी तंदुरुस्ती सिद्ध करा, मगच आयपीएलला जा,” असा फतवा श्रीलंका क्रिकेट बोर्डाने काढला आहे. यामुळे केकेआरचा स्टार वेगवान गोलंदाज मथिशा पथिराणा, लखनौचा वनिंदू हसरंगा आणि आरसीबीचा नुवान तुषारा यांच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’वर (NOC) पेच निर्माण झाला आहे.
पथिराणा एप्रिलच्या मध्यापर्यंत बाहेरच – SLC NOC
केकेआरने मोठ्या आशेने संघात घेतलेला मथिशा पथिराणा सध्या दुखापतीतून सावरत असून तो पुनर्वसन (Rehab) प्रक्रियेत आहे. बोर्डाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, पथिराणा, हसरंगा आणि इशान मलिंगा यांची शारीरिक क्षमता चाचणी अद्याप झालेली नाही. हे खेळाडू टी-२० वर्ल्ड कप दरम्यान जखमी झाले होते. पथिराणा आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार हे आता निश्चित झाले असून, तो एप्रिलच्या मध्यापासूनच केकेआरसाठी उपलब्ध होऊ शकेल.
काही खेळाडूंना मिळाला ‘ग्रीन सिग्नल’ SLC NOC
Dushmantha ✅
Kamindu ✅
Pathum ✅ Passed Fitness Tests & Got NOC from SLCNuwan Thushara’s Approval Pending till his Upcoming Fitness Test
Wanindu , Eshan & Matheesha still Recovering , Their NOC Will be Given if they Pass the Fitness Test After Rehab pic.twitter.com/KNhBvuGK5L
— Cricket With Sajee ( Sajeewa Rathkarawwa ) (@SajeewaRathkar2) March 20, 2026
दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सच्या दुष्मंथा चमिरा आणि पथूम निसंका यांना बोर्डाने हिरवा कंदील दाखवला असून ते भारतात येण्यासाठी सज्ज आहेत. सनरायझर्स हैदराबादच्या कमिंदू मेंडिसलाही एनओसी मिळाली आहे. मात्र, नुवान तुषाराचा आयपीएल प्रवेश त्याच्या आगामी फिटनेस टेस्टच्या निकालावर अवलंबून असेल.
बोर्डाचा फिटनेसवर विशेष भर – SLC NOC
श्रीलंका सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने आणि नवीन निवड समितीने खेळाडूंच्या फिटनेसबाबत कठोर भूमिका घेतली आहे. मे महिन्यापर्यंत श्रीलंकेचा कोणताही आंतरराष्ट्रीय सामना नसल्याने, हा काळ खेळाडूंचा फिटनेस स्तर उंचावण्यासाठी वापरला जात आहे. यामुळेच आयपीएल फ्रँचायझींना आपल्या स्टार खेळाडूंसाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.





