Akash Deep Ruled Out : केकेआरला दुहेरी धक्का! हर्षित राणानंतर आता ‘हा’ भारतीय स्टार खेळाडूही IPL 2026 मधून बाहेर
Akash Deep Ruled Out : हर्षित राणानंतर आता संघाचा आणखी एक हुकुमी एक्का आणि भारतीय वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

Akash Deep Ruled Out IPL 2026 from KKR : आयपीएल २०२६ च्या रणधुमाळीपूर्वी कोलकाता नाईट रायडर्ससाठी वाईट बातम्यांचे सत्र सुरूच आहे. स्टार गोलंदाज हर्षित राणा आधीच बाहेर पडलेला असताना, आता बंगालचा २९ वर्षीय वेगवान गोलंदाज आकाश दीप देखील या हंगामाला मुकणार आहे. केकेआरच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘क्रिकबझ’शी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला असून, आकाश दीप संपूर्ण मोसमात खेळू शकणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
एक कोटींत झाली होती खरेदी – Akash Deep Ruled Out
अबू धाबी येथे झालेल्या मिनी-लिलावात केकेआरने आकाश दीपला त्याच्या एक कोटी रुपयांच्या मूळ किमतीत (Base Price) खरेदी केले होते. हर्षित राणाच्या अनुपस्थितीत आकाश दीपवर वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करण्याची मोठी जबाबदारी होती. मात्र, आता तोच बाहेर पडल्याने मेंटॉर ड्वेन ब्राव्हो आणि प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्यासमोर गोलंदाजीचे समीकरण जुळवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
दुखापतींचा पाठलाग कायम –
🚨 TOUGH TIME FOR KKR IN IPL 2026 🚨
– Pathirana not available till April Mid.
– Harshit Rana ruled out.
– Akash Deep ruled out. 🤯— Sam (@Cricsam01) March 21, 2026
आकाश दीपच्या आयपीएल कारकिर्दीत दुखापतींनी नेहमीच अडथळा आणला आहे. २०२२ मध्ये पदार्पण केल्यापासून तो आतापर्यंत केवळ १४ सामने खेळू शकला आहे. गेल्या हंगामात तो लखनऊ सुपर जायंट्सचा भाग होता, जिथे त्याने ६ सामन्यांत ३ विकेट्स घेतले होते. दुर्दैवाने, तो कोणत्याही एका हंगामात सर्व सामने खेळू शकलेला नाही. सध्या तो बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्स (COE) मध्ये रिहॅब प्रक्रियेतून जात आहे.
केकेआरसमोर रिप्लेसमेंटचे आव्हान –
KKR suffer another injury blow – Akash Deep Ruled Out Of #IPL 2026 😱 pic.twitter.com/02jx8SHgxm
— Aakash Chopra (@cricketaakash) March 21, 2026
१८ मार्चपासून कोलकाता येथे केकेआरचे सराव शिबिर सुरू झाले आहे, मात्र आकाश दीप त्यात सहभागी होऊ शकला नाही. श्रीलंकेचा मथीशा पथिराणा देखील अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. अशा परिस्थितीत आता केकेआर व्यवस्थापन आकाश दीपच्या जागी कोणत्या खेळाडूला संधी देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





