Singapore Open 2024 : भारताच्या ‘त्रिशा-गायत्री’चा विजयी धमाका, उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक….

Singapore Open 2024 badminton : कलंग येथे सुरू असलेल्या सिंगापूर बॅडमिंटन ओपन 2024 बीडब्लूएफ सुपर 750 स्पर्धेत महिला दुहेरी प्रकारात त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद या (Treesa jolly and Gayatri gopichand) भारतीय जोडीने या स्पर्धेत भारतीयांच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. भारतीय जोडीने दुसऱ्या फेरीत 59 मिनिटे चाललेल्या सामन्यात विद्यमान ऑल इंग्लंड चॅम्पियन आणि रिपब्लिक ऑफ कोरियाच्या ‘बाएक हा ना’ आणि ‘ली सो ही’ जोडीचा 21-9, 14-21, 21-15 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
ABSOLUTELY MAGNIFICENT 🤩💯
Treesa/Gayatri get the better of WR-2 Baek/Lee 🇰🇷 in a 3-game thriller to enter quarterfinals in style 🔥
📸: @badmintonphoto@himantabiswa | @sanjay091968 | @Arunlakhanioffi #SingaporeOpen2024#IndiaontheRise#Badminton pic.twitter.com/Boxlej1YOu
— BAI Media (@BAI_Media) May 30, 2024
भारतीय जोडी आता उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी शुक्रवारी ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या आणि दक्षिण कोरियाच्या ‘किम सो योंग’ आणि ‘कोंग ही योंग’ या जोडीशी भिडणार आहेत.
दुसरीकडे, याच स्पर्धेत भारताच्या एचएस प्रणॉयलाही पुरुष एकेरीतील दुसऱ्या फेरीत निराशेचा सामना करावा लागला. प्रणॉयला खालच्या मानांकित जपानच्या केंटा निशिमोतेविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. 1 तास 18 मिनिटे चाललेल्या या लढतीत जपानच्या शटलरने जगातील 10व्या क्रमांकाच्या भारतीय खेळाडूचा 21-13, 14-21, 21-15 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
याआधी बुधवारी राष्ट्रकुल चॅम्पियन लक्ष्य सेन आणि किदाम्बी श्रीकांत पुरुष एकेरी गटात आधीच स्पर्धेबाहेर झाले होते. लक्ष्यला अव्वल मानांकित व्हिक्टर ऍक्सेलसेनकडून पराभव पत्करावा लागला तर श्रीकांत दुखापतीमुळे निवृत्त झाल्यामुळे स्पर्धेत आगेकूच करू शकला नाही.





