Singapore Open 2024 : भारताच्या ‘त्रिशा-गायत्री’चा विजयी धडाका सुरूच, उपांत्य फेरीत मारली धडक….

Singapore Open 2024 badminton : कलंग येथे सुरू असलेल्या सिंगापूर बॅडमिंटन ओपन 2024 BWF सुपर 750 स्पर्धेत त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय युवा बॅडमिंटन जोडीने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत 30व्या स्थानावर असलेल्या या भारतीय जोडीने 79 मिनिटे चाललेल्या अत्यंत रोमांचकारी उपांत्यपूर्व फेरीत कोरियाच्या किम सो यंग आणि काँग ही योंग यांचा 18-21, 21-19, 24-22 असा पराभव केला.
भारतीय जोडी उपांत्य फेरीत इंडोनेशिया आणि जपान यांच्यातील सामन्यातील विजेत्याशी भिडणार आहे. या विजयासह भारतीय जोडी मोसमातील पहिला उपांत्य सामना खेळणार आहे. याआधी दोघींची जोडी 2023 ऑल इंग्लंड ओपनच्या उपांत्य फेरीत पोहोचली होती. त्यावेळी भारतीय संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता.
➡️ 1st ever #Super750 semifinal
➡️ Beat World No. 6 duo
➡️ Back-to-back big winsWell done girls, keep it up! 💪
📸: @badmintonphoto@himantabiswa | @sanjay091968 | @Arunlakhanioffi #SingaporeOpen2024#IndiaontheRise#Badminton pic.twitter.com/osTchoG3bq
— BAI Media (@BAI_Media) May 31, 2024
पहिला गेम गमावल्यानंतर पुनरागमन…
गायत्री-त्रिशा आणि कोरियाची जोडी याच्यातील सामना चुरशीचा झाला, पहिल्या गेममध्ये पहिल्या 4 गुणानंतर भारतीय जोडी पिछाडीवर पडली. कोरियाच्या किम आणि कोंग यांनी मात्र तीन गुणांची आघाडी घेत ती कायम राखली. या काळात भारतीय जोडीने अनेक चुका केल्या आणि त्यांना पुनरागमनाची संधी मिळाली नाही आणि दक्षिण कोरियाच्या जोडीने पहिला गेम 21-18 असा जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये गायत्री-त्रिशा यांनी वेगळी रणनीती अवलंबली. मात्र, 7-3 ने आघाडी घेतल्यानंतर त्रिशा-गायत्रीने सलग 5 गुण गमावले. पूर्वार्धानंतर कोरियन जोडीने दडपण निर्माण केले, मात्र भारताने दमदार पुनरागमन करत हा गेम 21-19 असा जिंकून सामना बरोबरीत आणला. तिसऱ्या गेममध्ये स्पर्धा चुरशीची झाली. दोन्ही स्पर्धकांनी आघाडी 3 पेक्षा जास्त वाढू दिली नाही. दोन मॅच पॉइंट गमावल्यानंतर गायत्री आणि त्रिशा यांनी 24-22 असा गेम जिंकला.
Singapore Open 2024 : भारताला आणखी एक धक्का, सिंधूनंतर एच.एस प्रणॉयचेही आव्हान संपुष्टात…
तत्पूर्वी, भारतीय जोडीने दुसऱ्या फेरीत 59 मिनिटे चाललेल्या सामन्यात विद्यमान ऑल इंग्लंड चॅम्पियन आणि रिपब्लिक ऑफ कोरियाच्या ‘बाएक हा ना’ आणि ‘ली सो ही’ जोडीचा 21-9, 14-21, 21-15 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता.
दरम्यान, याआधी पी.व्ही. सिंधू, एच.एस. प्रणॉय, लक्ष्य सेन, किदाम्बी श्रीकांत आणि सात्विकसाईराज रँकी रेड्डी-चिराग शेट्टी ही जोडी आपापले सामने गमावून स्पर्धेबाहेर पडले आहेत.





