Shubman Gill : उपकर्णधारपदावरून थेट संघाबाहेर केल्याने गिलने पहिल्यांदाच सोडलं मौन; म्हणाला, निवड समितीच्या…

Shubman Gill Reaction on dropped in T20 world Cup Squad : भारतीय क्रिकेट वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून शुबमन गिलला टी-२० संघातून वगळण्यावरून मोठी चर्चा सुरू आहे. एकेकाळी टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटचा भावी कर्णधार म्हणून ज्याच्याकडे पाहिले जात होते, त्या शुबमन गिलला आगामी टी-२० वर्ल्ड कपच्या १५ सदस्यीय संघातून चक्क डच्चू देण्यात आला. या धक्कादायक निर्णयावर अखेर शुबमन गिलने मौन सोडले असून, निवड समितीच्या निर्णयावर आपली रोखठोक भूमिका मांडली आहे.
उपकर्णधार ते थेट संघाबाहेर –
सूर्यकुमार यादवनंतर शुबमन गिल टी-२० संघाचे नेतृत्व करेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, काही दिवसांपूर्वी जेव्हा वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर झाला, तेव्हा उपकर्णधार असलेल्या गिलला थेट संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. या निर्णयामुळे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्यावर टीकेची झोड उठली होती.
प्रेस कॉन्फरन्समध्ये गिल काय म्हणाला?
I respect the selectors’ decision. All the best to the team for the T20 World Cup: Gill
I don’t think any format is easy. Every format requires resilience: Gill
As sportspersons we have to stay at the present. It makes our life a lot simpler: Gill#ShubmanGill #INDvsNZ pic.twitter.com/BrG4yneS7J— Nitika Sharma (@Nitika3012) January 10, 2026
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी कर्णधार म्हणून शुबमन गिल पत्रकार परिषदेला सामोरे गेला. यावेळी त्याला टी-२० संघातून वगळल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर गिल अत्यंत संयमीपणे म्हणाला, “सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मी माझ्या आयुष्यात सध्या जिथे असायला हवे होते, तिथेच आहे. माझ्या नशिबात जे काही लिहिले असेल, ते मला नक्कीच मिळेल. एक खेळाडू म्हणून माझे मुख्य उद्दिष्ट संघाला विजय मिळवून देणे हेच आहे.”
निवड समितीचा आदर आणि वर्ल्ड कपसाठी शुभेच्छा –
यावेळी गिलने कोणत्याही वादात न पडता निवड समितीच्या निर्णयाचा आदर केला. तो पुढे म्हणाला, “मी निवड समितीच्या निर्णयाचा पूर्ण सन्मान करतो. टी-२० संघाला माझ्याकडून खूप शुभेच्छा आहेत. मला पूर्ण खात्री आहे की आपला संघ हा वर्ल्ड कप जिंकेल.”
हेही वाचा – Shreyas Iyer Attack : कुत्र्याला कुरवाळणं श्रेयस अय्यरला पडलं असतं महागात; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
आता लक्ष न्यूझीलंड वनडे मालिकेवर –
टी-२० संघातून जरी बाहेर असला तरी वनडे क्रिकेटमध्ये शुबमन गिल सध्या भारतीय संघाचा ‘कॅप्टन’ आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत तो कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे. वनडे फॉरमॅटमधील आपला दबदबा कायम राखून निवड समितीला प्रत्युत्तर देण्याची मोठी संधी आता गिलकडे असणार आहे.





