Women’s T20 World Cup 2024 : टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर, न्यूझीलंडनं पाकिस्तानचा पराभव करत गाठली उपांत्य फेरी….

Women’s T20 World Cup 2024 (PAK vs NZ) : महिला T20 विश्वचषक 2024 मधील हरमनप्रीत आणि कंपनीचा प्रवास संपला आहे. भारतीय संघाच्या आशा पाकिस्तानवर अवलंबून होत्या, पण शेजारील देशाच्या मुलीही भारतीय संघाचे नशीब बदलू शकल्या नाहीत. न्यूझीलंडने पाकिस्तानला एकतर्फी लढतीत हरवून उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित केले आहे. अ गटातून अंतिम चारमध्ये पोहोचणारा न्यूझीलंड हा दुसरा संघ ठरला आहे. टीम इंडियाचे पुन्हा एकदा टी-20 विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न केवळ स्वप्नच राहिले आहे.
हरमनप्रीत आणि कंपनीच्या नजरा पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सामन्यावर खिळल्या होत्या. वास्तविक, किवी संघाचा पराभव आणि पाकिस्तानचा विजय यामुळे भारतीय संघाला उपांत्य फेरीचे तिकीट मिळू शकले असते. मात्र, पाकिस्तान संघाने न्यूझीलंडसमोर अगदी सहज शरणागती पत्करली आणि यासोबतच टीम इंडियाही वर्ल्डकपमधून बाद झाली. गेल्या टी-20 विश्वचषकात हरमनप्रीतची सेना उपांत्य फेरीत पोहोचली होती, मात्र यावेळी गटातच पराभूत होऊन संघ बाहेर पडला.
पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 110 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या 56 धावांवर गडगडला. संघाची एकही फलंदाज क्रीझवर टिकू शकली नाही आणि पाकिस्तानची फलंदाजीची क्रम पत्त्याच्या गठ्ठाप्रमाणे कोसळला आणि 54 धावांनी विजय मिळवत न्यूझीलंडने उपांत्य फेरीचे तिकीटही मिळवले आहे.
New Zealand seal semi-final spot with a thumping win over Pakistan 🇳🇿👌#WhateverItTakes #PAKvNZ
📝: https://t.co/DS7lHPKbrj pic.twitter.com/xifREWOaqt
— T20 World Cup (@T20WorldCup) October 14, 2024
ऑस्ट्रेलियामुळे भारतावर पुन्हा आली ही वेळ..
स्पर्धेची सुरुवात भारतीय संघासाठी निराशाजनक झाली. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत अँड कंपनीला न्यूझीलंडकडून 58 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवामुळे टीम इंडियाचा मार्ग खडतर झाला. यानंतर पाकिस्तान आणि नंतर श्रीलंकेवर मोठे विजय नोंदवून संघाने उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवल्या, पण साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा टीम इंडियाचे स्वप्न भंगले.
Ranji Trophy 2024-25 : चॅम्पियन मुंबईचा लाजिरवाणा पराभव, बडोद्याने 26 वर्षांनंतर प्रथमच मिळवला विजय…
करा या मरो या सामन्यात कांगारू संघाने भारताचा 9 धावांनी पराभव केला. महत्त्वाच्या सामन्यांमध्ये भारतीय फलंदाज सपशेल फ्लॉप झाले. कर्णधार हरमनप्रीत कौरने फलंदाजीत नक्कीच छाप पाडली, पण अखेरच्या षटकात तिला विजयावर शिक्कामोर्तब करण्यात अपयश आले. टी-20 विश्वचषकाच्या 9व्या आवृत्तीतही भारतीय संघाला रिकाम्या हाताने मायदेशी परतावे लागणार आहे.





