Shruti Marathe: विद्याधर जोशींनी कलाकारांच्या ढोलपथकावर सवाल करताच श्रुती मराठेने दिले सडेतोड उत्तर; म्हणाली “घरी बसून फेसबुकवर…”
Shruti Marathe:

Shruti Marathe: पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत दरवर्षी ‘कलावंत ढोल ताशा पथका’चे वादन चर्चेत असते. मराठी मनोरंजसृष्टीतील अनेक कलाकारांनी एकत्र येऊन या पथकाची स्थापना केलीय, 2014 मध्ये स्थापन करण्यात आलेलं हे पथक, दरवर्षी गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये वादन सादर करताना पाहायला मिळतं.
श्रुती मराठे, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित, सौरभ गोखले यांच्यासोबतच इतरही अनेक कलाकारांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण, आता याच कलावंतांच्या ढोलताशा पथकासंदर्भात मराठी मनोरंजनसृष्टीतले बाप्पा म्हणून ओळखले जाणारे अभिनेते विद्याधर जोशी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
विद्याधर जोशी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत विचारले की, “एक आपली उत्सुकता… हे पुण्यातल्या कलाकार पथकातले वादक विसर्जनाच्या मिरवणुकीत एकूण किती वेळ ‘वादन’ करतात? ज्या जोशाने ते रिल्स मध्ये वाजवताना दिसतात तितक्याच जोशात ते सतत ‘वादन’ करतात का?” असे दोन प्रश्न विचारले. यावर श्रुती मराठेनेही पोस्ट करत उत्तर दिले आहे.
श्रुती मराठेचे सडेतोड उत्तर
विद्याधर जोशींच्या पोस्टवर कमेंट करत श्रुती मराठेनं म्हटलंय की, “बाप्पा… 1.5 महिन्यांची प्रॅक्टिस 11 दिवसांत 14 वेळा वादन आणि शेवटच्या दिवशी जवळपास साडेसात तासांची विसर्जन मिरवणूक एवढं आम्ही करतो. कारण, आम्हाला वादन करायला मनापासून आवडतं. बाकी आमच्या वादनाची शंका असेल, तर पुढच्या वर्षी जरुर या एक दिवस तरी बघायला…
तुमचे सगळे प्रश्न सुटतील, घरी बसून फेसबुकवर टाकून प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत बाप्पा… जे लोक आम्हाला लाइव्ह बघतात, ते असे प्रश्न फेसबूकवर टाकत नाहीत…” श्रुतीने दिलेल्या या उत्तराची सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चा रंगली असून, अनेकांनी तिला पाठिंबा दिला आहे.
त्यानंतर श्रुतीच्या कमेंटवर उत्तर देताना विद्याधर जोशी म्हणाले, “श्रुती, तुझ्या पहिल्या तीन ओळीत मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, धन्यवाद. माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. प्रत्यक्ष येऊन बघायची काहीही गरज नाही… आणि तसेही मला येऊन बघण्यापेक्षा कदाचित वाजवणं आवडेल. कारण वाजवणाऱ्याला त्रास होत नाही, बघणाऱ्याला किंवा ऐकणाऱ्याला तो जास्त होतो असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. FBवरती प्रश्न विचारून तू माझ्या प्रश्नाला उत्तर दिलंस, याबद्दल तुझे शतशः आभार. तुला माझा राग आला असेल तर ते योग्यच आहे”.
हेही वाचा :





