पुणे -राज्य पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या झाल्यानंतर पुण्यात बाहेरून बदलून आलेल्या 14 पोलीस निरीक्षकांच्या नियुक्तीचे आदेश तसेच आयुक्तालयातील 8 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मंगळवारी (दि. 27) रात्री दिले.
बदलून आलेले पोलीस निरीक्षक – सुरेंद्र माळाळे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहकारनगर), राजकुमार शेरे (पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा), कांचन जाधव (पोलीस निरीक्षक (गुन्हे), येरवडा), सुरेशसिंग गौड (वरिष्ठ निरीक्षक, मार्केट यार्ड), दशरथ पाटील (वरिष्ठ निरीक्षक, नियंत्रण कक्ष), धनंजय पिंगळे (निरीक्षक वाहतूक शाखा), संदीप देशमाने (निरीक्षक (गुन्हे), सहकारनगर), सीमा ढाकणे (निरीक्षक (गुन्हे) लोणीकंद), संतोष पांढरे (वाहतूक शाखा), शंकर साळुंखे (निरीक्षक (गुन्हे) डेक्कन), नंदकुमार गायकवाड (निरीक्षक गुन्हे शाखा : दरोडा व वाहन चोरी प्रतिबंधक पथक), स्वप्नाली शिंदे (निरीक्षक (गुन्हे), मार्केट यार्ड), मनीषा पाटील (निरीक्षक (गुन्हे) चतुःश्रृंगी), चेतन मोरे (निरीक्षक (गुन्हे) कोरेगाव पार्क).
शहरातील निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या : अशोक इंदलकर (वाहतूक शाखा बदली आदेशाधिन ते पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, दरोडा व वाहन चोरी प्रतिबंधक पथक), सावळाराम साळगांवकर (वरिष्ठ निरीक्षक, सहकारनगर ते निरीक्षक, नियंत्रण कक्ष), दीपाली भुजबळ, निरीक्षक (गुन्हे) कोरेगाव पार्क ते निरीक्षक वाहतूक शाखा), नंदकुमार बिडवई (निरीक्षक, विशेष शाखा ते निरीक्षक गुन्हे शाखा, युनिट), शफिल पठाण (निरीक्षक (गुन्हे), डेक्कन ते निरीक्षक (गुन्हे) हडपसर), सविता ढमढेरे (निरीक्षक (गुन्हे), मार्केटयार्ड ते निरीक्षक वाहतूक शाखा), क्रांतीकुमार पाटील (निरीक्षक, गुन्हे शाखा, युनिट ते निरीक्षक, विशेष शाखा), सुनील पंधरकर (निरीक्षक, गुन्हे शाखा ते निरीक्षक विशेष शाखा)