Shrikant Shinde : श्रीकांत शिंदे यांचा ‘मिशन महाराष्ट्र’ दौरा! ६५ विधानसभा मतदारसंघांत कार्यकर्त्यांशी साधणार संवाद
Shrikant Shinde : शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे १६ मे पासून महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.

Shrikant Shinde : शिदेंसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे हे 16 मे पासून राज्यातील 65 ते 70 विधानसभा मतदार संघाचा दौरा करणार आहेत. त्यांचा हा दौरा 15 जुलै रोजी संपणार आहे. या दौऱ्यात खासदार शिंदे हे थेट कार्यकर्त्यांनी संवाद साधणार आहेत. (Shrikant Shinde)
तसेच सखोल विशेष पडताळणी मोहिमेअंतर्गत शिवसेना पक्षाच्या नेमणुकांचा आढावा घेणार आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांनी इतर जिल्ह्यात दौरा केला आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी 65 ते 70 ठिकाणी दौरे केले आहेत. (Shrikant Shinde)
आता श्रीकांत शिंदे यांचा 22 जिल्ह्याचा हा दौरा होणार आहे. यापूर्वी ज्या लोकांना पद दिली त्याचे कामच मूल्यमापन केले जाईल. या दौऱ्याच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना संघटनात्मक ताकद देण्याचे काम करण्यात येणार आहे. हा दौरा संघटनेच्या दृष्टीने महत्वाचा असणार आहे.
दौऱ्याचे तीन टप्पे
हा दौरा तीन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात नाशिक, धुळे, अहिल्यानगर, बीड, अमरावती, अकोला हा दौरा असणार आहे. दुसऱ्या टप्प्यात जळगाव, नंदुरबार, यवतमाळ, वाशिम, नांदेड, हिंगोली, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली असा दौरा असणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यात बुलढाणा, जालना, नागपूर, भंडारा, गोंदिया, ठाणे आणि पालघर असा हा दौरा असणार आहे.





