Bajrang Sonwane : खासदार बजरंग सोनवणेंना मोठा धक्का; विलास घुले हत्याप्रकरणात मुलावर पहिली कारवाई
Bajrang Sonwane : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल व्यावसायिक विलास घुले हत्याप्रकांडाला आता राजकीय वळण मिळाले आहे.

Bajrang Sonwane : केज तालुक्यातील टाकळी येथे हॉटेल व्यावसायिक विलास घुले यांच्या हत्याप्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे याचे नाव पोलिसांनी पुरवणी जबाबात समाविष्ट केल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. (Bajrang Sonwane)
20 जून रोजी झालेल्या या हत्येनंतर आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याचा आणि वाहन उपलब्ध करून दिल्याचा आरोप सौरभ सोनवणे यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर घुले कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत अनेकदा रास्ता रोको आंदोलन करत सौरभचे नाव गुन्ह्यात समाविष्ट करण्याची मागणी केली होती. (Bajrang Sonwane)
या प्रकरणात पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी सुरुवातीला पुरावे नसताना कारवाई करता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, आंदोलकांचा दबाव, तसेच विधिमंडळ अधिवेशनात मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलेल्या मागणीनंतर तपासाला वेग आला. (Bajrang Sonwane)
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आंदोलकांशी दूरध्वनीवरून संवाद साधत दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले होते. त्यानंतर पोलिसांनी सर्व मुख्य आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. (Bajrang Sonwane)

आता पुरवणी जबाबात सौरभ सोनवणे यांचे नाव समाविष्ट करण्यात आले असून त्यांच्या भूमिकेचाही तपास केला जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. “पुरावे मिळाल्यास कोणालाही सोडले जाणार नाही,” अशी भूमिका पोलीस प्रशासनाने घेतली आहे. (Bajrang Sonwane)
दरम्यान, या प्रकरणावरून बीड जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विविध राजकीय नेत्यांच्या भूमिकांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. खासदार बजरंग सोनवणे यांनी मात्र, “माझ्या मुलाविरोधात पुरावे आढळल्यास कारवाई करा,” असे म्हणत राजकीय हेतूने प्रकरण रंगवले जात असल्याचा आरोप केला आहे. विलास घुले हत्याकांडाचा तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून सौरभ सोनवणे यांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. (Bajrang Sonwane)
Bajrang Sonwane : मोठी बातमी! खासदार बजरंग सोनवणेंच्या कारला अपघात, परिसरात तणाव
Dhananjay Munde : धनंजय मुंडे पुन्हा नव्या वादात अडकणार? ‘हे’ प्रकरण अंगलट येणार?





