Maharashtra Politics : भाजप आमदाराच्या पत्नीचे निधन; फडणवीसांनी केले सर्व नाशिक दौरे रद्द
Maharashtra Politics : नाशिक पूर्वचे भाजप आमदार राहुल ढिकले यांच्या पत्नी आदिती ढिकले यांचे ४० व्या वर्षी निधन झाले.

Maharashtra Politics : नाशिक पूर्व मतदारसंघाचे भाजप आमदार राहुल ढिकले यांच्या पत्नी आदिती ढिकले यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधील आपले सर्व नियोजित दौरे तात्काळ रद्द केले. (Maharashtra Politics)
मुख्यमंत्री फडणवीस सध्या नाशिक दौऱ्यावर होते. मात्र ही दुःखद बातमी मिळाल्यानंतर त्यांनी नियोजित कुंभमेळा आढावा बैठक तसेच पुरोहित संघासोबतची बैठक रद्द करण्याचा निर्णय घेतला. (Maharashtra Politics)
आदिती ढिकले यांनी खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे ढिकले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस हे रुग्णालयात जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
अंत्यदर्शनानंतर मुख्यमंत्री पुढील नियोजित कार्यक्रमासाठी धुळे येथे रवाना होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. (Maharashtra Politics)
हेही वाचा
PCMC Action : पालिकेची धडक मोहीम! प्रक्रिया न केलेले पाणी सोडले अन् ७० हजारांचा दंड बसला





