Shreyas Iyer Reaction : ‘पॉवरप्लेमध्येच सामना हातातून निसटला!’ ऑकलंडमधील पराभवाच खापर कर्णधार श्रेयस अय्यरने कोणावर फोडलं?
Shreyas Iyer Reaction : श्रेयस अय्यरने ग्लेन फिलिप्सच्या शानदार खेळीबद्दल त्याचे कौतुक केले. कर्णधाराच्या मते, न्यूझीलंडने फलंदाजी पॉवरप्लेमध्ये सामन्यावर पकड मिळवली आणि गोलंदाजांना डावावर वर्चस्व गाजवू दिले नाही.

Shreyas Iyer Reaction After India Defeat Against New Zealand 4th T20 : ऑकलंड येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने भारताचा तब्बल ८७ धावांनी धुव्वा उडवला. या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने गोलंदाजांच्या सुमार कामगिरीवर बोट ठेवले आहे. न्यूझीलंडने पहिल्या सहा षटकांच्या फलंदाजी पॉवरप्लेमध्येच सामन्यावर पूर्ण ताबा मिळवला होता, असे श्रेयसने स्पष्ट केले. किवी संघाने प्रथम फलंदाजी करताना ग्लेन फिलिप्सच्या तुफानी १०७ धावांच्या जोरावर २० षटकांत ७ बाद २५९ धावांचा डोंगर उभारला होता; प्रत्युत्तरात भारतीय संघ २० षटकांत ९ बाद १७२ धावांपर्यंतच मजल मारू शकला.
गोलंदाजी ढेपाळली; फिलिप्सच्या शतकाचे केले कौतुक –
सामन्यानंतर बोलताना कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला, “आमची गोलंदाजी अपेक्षेनुसार झाली नाही. त्यांनी बॅटिंग पॉवरप्लेमध्येच सामन्याची गती (मोमेंटम) स्वतःच्या बाजूने झुकवली. आम्ही गोलंदाजीत काही बदल करून पुनरागमनाचा प्रयत्न केला, मात्र याचे श्रेय ग्लेन फिलिप्सला द्यावे लागेल; त्याने अप्रतिम आणि आक्रमक शतकी खेळी केली. चुकांमधून शिकून आम्ही नेमके कुठे मागे पडलो यावर विचार करणे गरजेचे आहे.”
मैदानाचा आकार आणि खेळाडूंचा अनुभव; हॅमिल्टनमध्ये रणनीती बदलणार
We fell a bit short in our bowling: Shreyas Iyer after New Zealand defeat India
Shreyas Iyer said:
“I think we fell a bit short in our bowling to start with. Powerplay, especially in the third over, they got that momentum from there on, and yeah, a couple of bowlers tried to squeeze in, but I think exceptional knock by Glenn. Some phenomenal shots, which were like pure bliss. So kudos to him. He’s been consistent throughout the series, so a lot to learn from him.
I personally feel that we can probably go back to the drawing board and see to it we analyse and try to execute to the best of our abilities in the next game.
We knew the dimensions were going to be like this. First time for some of them. Not easy to adapt. The way they executed in the first three games was magnificent. Great learning curve.”
— Cricket Hub (@Anurag9793) October 30, 2026
पुढील सामन्याबाबत बोलताना कर्णधार म्हणाला, “आता आम्ही हॅमिल्टनला जात असून मध्ये फक्त एकाच दिवसाचा अवधी आहे. अशा वेळी आम्हाला नव्याने रणनीती आखून ज्या गोष्टींमध्ये सुधारणा हवी आहे त्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. आम्हाला ऑकलंडच्या मैदानाच्या आकाराची कल्पना होती; मात्र काही युवा खेळाडू येथे पहिल्यांदाच खेळत असल्याने परिस्थितीशी जुळवून घेण्यास वेळ लागतो. मला पूर्ण विश्वास आहे की खेळाडू पुढील सामन्यात जोरदार पुनरागमन करतील.”
पहिल्याच षटकात दोन धक्के; भारताची फलंदाजी सपशेल अपयशी
प्रत्युत्तरात २६० धावांच्या डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली. किवी वेगवान गोलंदाज जेकब डफीने पहिल्याच षटकात संजू सॅमसन (४) आणि इशान किशन (०) या दोघांना बाद करून भारताची अवस्था २ बाद ४ धावा अशी बिकट केली. कर्णधार श्रेयस (२२) आणि अभिषेक शर्मा (२७) यांच्यातील ४६ धावांची भागीदारी हीच डावातील सर्वोच्च ठरली. सुरुवातीच्या धक्क्यांमधून भारतीय संघ अखेरपर्यंत सावरू शकला नाही आणि एकतर्फी पराभवाला सामोरे जावे लागले.





