Shreyas Iyer Reaction : ‘मी कोणाच्या सावलीत राहणार नाही…’, टीम इंडियाचा नवा टी-२० कर्णधार बनताचा श्रेयस अय्यरची पहिलीच प्रतिक्रिया
Shreyas Iyer Reaction : कर्णधार बनल्यानंतर अय्यरने स्पष्ट केले आहे की, राष्ट्रीय संघाचे नेतृत्व मिळाले म्हणून त्याला स्वतःचे व्यक्तिमत्त्व बदलण्याची अजिबात गरज नाही.

Shreyas Iyer First Reaction As India New T20I Captain : बीसीसीआयने सूर्यकुमार यादवला हटवून स्टार फलंदाज श्रेयस अय्यरकडे टीम इंडियाच्या टी-२० संघाचे कर्णधारपद सोपवले आहे. या ऐतिहासिक घोषणेनंतर आता श्रेयस अय्यरची पहिली अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. कर्णधार बनल्यानंतर अय्यरने स्पष्ट केले आहे की, राष्ट्रीय संघाचे नेतृत्व मिळाले म्हणून त्याला स्वतःचे व्यक्तिमत्त्व बदलण्याची अजिबात गरज नाही. मुंबईच्या अत्यंत कठीण आणि स्पर्धात्मक क्रिकेट वातावरणात ज्या स्वभावामुळे त्याने स्वतःची ओळख निर्माण केली, तोच स्वभाव तो पुढेही कायम ठेवणार आहे.
“मला कोणाच्या सावलीत राहण्याची गरज नाही!”
मुंबईत पार पडलेल्या एका कार्यक्रमात बोलताना श्रेयस अय्यर म्हणाला, “मला माझे व्यक्तिमत्त्व बदलण्याची कोणतीही गरज वाटत नाही. मी आधी जसा होतो, तसाच राहणे मला आवडेल. मी इतर कोणासारखे बनण्याचा किंवा कोणाच्या सावलीत राहण्याचा प्रयत्न कधीही करणार नाही.”
मुंबईसारख्या क्रिकेटवेड्या शहरात लहानाचा मोठा झाल्यामुळे आव्हाने हा त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग राहिली आहेत. अय्यरने पुढे सांगितले की, “मला नेहमीच आव्हानांचा सामना करायला आवडते. मुंबईत क्रिकेटचा दर्जा खूप वरचा असून तिथे कमालीची स्पर्धा असते. तिथला प्रत्येक दुसरा मुलगा मुंबईचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पाहत असतो. माझी विचारसरणी नेहमीच कठीण परिस्थितीत लढण्याची आणि विजय मिळवण्याची राहिली आहे.”
कप्तानी स्वीकारणे हे सर्वात मोठे आव्हान!
Shreyas Iyer about his Captaincy : “I don’t want to change my personality, I want to be the same person as I was before and I don’t want to be someone else or be under someone’s shadow”
Shots fired. Ultimatum given to GG that he’s not a puppet captain. 😭😭😭 pic.twitter.com/4KFbKl9Y40
— Dhillon (@sehajdhillon_) June 7, 2026
श्रेयसने सांगितले की, जेव्हा तुम्हाला कर्णधारपदासारखी मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी मिळते, तेव्हा तुम्ही तिचा आनंदाने स्वीकार करता. सध्याच्या घडीला बीसीसीआयने त्याच्यावर टाकलेली ही जबाबदारी त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठे आव्हान आहे. श्रेयस अय्यर आगामी आयर्लंडविरुद्धच्या २ सामन्यांच्या टी-२० मालिकेत पहिल्यांदाच भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसेल.
विशेष म्हणजे, तो आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना डिसेंबर २०२३ मध्ये खेळला होता. त्यानंतर तो प्रदीर्घ काळ या फॉरमॅटमधून बाहेर होता, मात्र आयपीएलमधील त्याच्या कर्णधारपदाच्या अनुभवामुळे त्याला ही लॉटरी लागली आहे. श्रेयसने २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) चॅम्पियन बनवले होते, तर २०२५ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्सने फायनल गाठली होती. आयपीएल २०२६ च्या पहिल्या ७ सामन्यांतही पंजाबने त्याच्या कप्तानीखाली चांगली कामगिरी केली होती.





