“शेतकरी पण लाडका आहे हे दाखवून द्या”; राज ठाकरेंचे राज्य सरकारला आवाहन

Raj Thackeray | मराठवाडा, विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना दमदार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. या मुसळधार पावसामुळे अनेक भागात जलमयस्थिती निर्माण झाली. मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. तसेच गणपतीच्या सणांत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, असं आवाहनही त्यांनी केले आहे.
राज ठाकरे यांनी ट्वीट करत लिहिले की, “गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात झालेल्या पावसाने, तिथल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं अमाप नुकसान झालं आहे. कित्येक पिकं अगदी काढणीला आलेली असताना वाहून गेली आहेत. डोळ्यासमोर उभं झालेलं पीक नष्ट होणं आणि ते देखील सणासुदीच्या तोंडावर, हे सहन करणं कठीण आहे. राज्यसरकारने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करून, जितक्या लवकर नुकसान भरपाईची रक्कम देता येईल ते पहावं. शेतकरी पण लाडका आहे हे दाखवून द्यावं,” असा टोलाही त्यांनी राज्य सरकारला लगावला. Raj Thackeray |
सस्नेह जय महाराष्ट्र,
गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात झालेल्या पावसाने, तिथल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं अमाप नुकसान झालं आहे. कित्येक पिकं अगदी काढणीला आलेली असताना वाहून गेली आहेत. डोळ्यासमोर उभं झालेलं पीक नष्ट होणं आणि ते देखील सणासुदीच्या तोंडावर, हे सहन करणं कठीण आहे.…
— Raj Thackeray (@RajThackeray) September 4, 2024
राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना
“तसंच मराठवाड्यातील महाराष्ट्र सैनिकांनी देखील प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे झटपट होत आहेत ना, नसल्यास ते करायला लावून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल हे पहावं. यात अजून एक गोष्ट म्हणजे पावसाच्या पाण्याने जमीन ओली झालेली असते, आणि ती सुकायला वेळ लागतो, यामुळे लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वच जण आजारी पडतात. त्यामुळे ज्या घरांत पाणी शिरलं आहे अशा ठिकाणी प्लॅस्टिकच्या शीट्स पोहचतील किंवा जुने फ्लेक्स तरी पोहचतील हे बघावे. किमान त्या निमित्ताने तरी पुढारी जनतेच्या घरात पोहोचतील आणि आजपर्यंत आपलं वाटोळ कोणी केलं तेही जनतेला समजेल,” असे आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिले आहेत. Raj Thackeray |
“या सगळ्यात सरकारने पण मदतीचा हात आखडता अजिबात घेऊ नये, आणि सणासुदीच्या सुट्ट्या असल्या तरी हा कठीण प्रसंग आहे हे लक्षात घेऊन, प्रशासनाला कामाला लावून नुकसान भरपाई गणपतीच्या सणाच्या काळात मिळेल हे पहावे,” असे आवाहन राज ठाकरे यांनी सरकारला केले आहे. Raj Thackeray |
हेही वाचा:
बाजार उघडताच कोसळला ! सेन्सेक्स 700 अंकांनी घसरला, टेक-आयटीमध्ये प्रचंड विक्री





