जमावाकडून धक्काबुक्की, गैरवर्तन…; निधी अग्रवालला पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड

Nidhhi Agerwal | साऊथ सुपरस्टार प्रभासच्या आगामी ‘द राजा साब’ घोषणा झाल्यानंतर या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटातील ‘सहाना सहाना’ या गाण्याचा लाँच सोहळा हैदराबादमध्ये झाला. यावेळी मोठी गर्दी पाहायला मिळाली. या कार्यक्रमाला निधी अग्रवालने देखील हजेरी लावली होती. मात्र कार्यक्रमातून बाहेर पडताना अभिनेत्री निधी अग्रवाल हिला प्रचंड गर्दीने घेरले, ज्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
या गाण्याचा लाँच सोहळा बुधवारी संध्याकाळी हैदराबादमधील प्रसिद्ध मॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला दिग्दर्शक मारुती आणि मुख्य अभिनेत्री निधी अग्रवाल यांनी हजेरी लावली होती. प्रभासचा चित्रपट असल्याने चाहत्यांनी मॉलमध्ये मोठी गर्दी केली होती. कार्यक्रम सुरळीत पार पडला. मात्र निधी अग्रवाल बाहेर येताच तिला चाहत्यांच्या गर्दीने वेढले. ही गर्दी एवढी वाढली की अभिनेत्रीला गाडीपर्यंत पोहचायला खूप त्रास झाला.
सेल्फी काढण्यासाठी धक्काबुक्की
चाहते तिला पाहण्यासाठी, ऑटोग्राफसाठी आणि तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी धक्काबुक्की करताना दिसले. तिच्या अवतीभवती बॉडीगार्ड असूनही ती गर्दीत पूर्णपणे अकडलेली दिसली. या गोंधळात निधीला धक्काबुक्की झाली आणि तिला अक्षरशः ओढण्यात आले. Nidhhi Agerwal |
View this post on Instagram
बॉडीगार्डच्या साहाय्याने आपला गुलाबी रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस सावरत निधी कशीबशी गाडीत जाऊन बसली. घडलेल्या प्रकारामुळे निधी खूपच घाबरलेली दिसत होती. निधी अग्रवालचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी यावर संतप्तजनक प्रतिक्रिया देत आहेत. Nidhhi Agerwal |
दिग्दर्शक मारुती यांचा ‘द राजा साब’ हा प्रभासचा पहिला हॉरर चित्रपट आहे. सुपरस्टार प्रभास एका पूर्णपणे वेगळ्या भूमिकेत यात दिसणार आहे. या चित्रपटात संजय दत्त, निधी अग्रवाल, मालविका मोहनन आणि रिद्धी कुमार यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट संक्रांतीच्या मुहूर्तावर 9 जानेवारी 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. Nidhhi Agerwal |
हेही वाचा:





