Mohammed Shami Trade Updates : आयपीएल २०२६ च्या लिलावापूर्वी फ्रँचायझींना आपली रिटेन्शन लिस्ट जाहीर करण्याची अंतिम तारीख (१५ नोव्हेंबर) जवळ आली आहे. त्यामुळे ट्रेड विंडोचा फायदा घेण्यासाठी संघांमध्ये खेळाडूंच्या अदलाबदलीची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. चेन्नई सुपर किंग्स-राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स-मुंबई इंडियन्स यांच्यातील ट्रेडच्या बातम्या जोरदार चर्चेत असतानाच, आता टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या नावाभोवतीही चर्चा सुरू झाली आहे. सध्या एसआरएच संघाचा भाग असलेल्या शमीवर आयपीएल २०२६ च्या हंगामापूर्वी दोन मोठ्या फ्रँचायझींचे लक्ष लागले आहे. शमीसाठी दोन फ्रँचायझी मैदानात – ‘क्रिकबझ’च्या एका रिपोर्टनुसार, मोहम्मद शमीला आपल्या संघात सामील करण्यासाठी लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) या दोन फ्रँचायझी उत्सुक आहेत. ही संधी सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन यांच्या संघासाठी फायदेशीर ठरू शकते, कारण शमीला ट्रेड करण्याची त्यांच्याकडे मोठी संधी आहे. दोन फ्रँचायझी मैदानात असल्याने, एसआरएच या संधीचा फायदा घेऊन चांगला करार करू शकते. १० कोटींची कॅश डील? माहितीनुसार, मोहम्मद शमीचा ट्रेड झाल्यास, तो केवळ ‘कॅश डील’ असेल. याचा अर्थ, सनरायझर्स हैदराबाद शमीच्या बदल्यात कोणत्याही खेळाडूला आपल्या संघात घेणार नाही, तर तो ट्रेड झालेल्या रकमेचा फायदा आगामी लिलावात घेईल. मागील मेगा ऑक्शनमध्ये एसआरएचने मोहम्मद शमीला तब्बल १० कोटी रुपये खर्च करून विकत घेतले होते. हेही वाचा – Sherfane Rutherford : मुंबई इंडियन्सचा ट्रेड डीलचा डबल धमाका! शार्दुल ठाकूरनंतर ‘या’ धडाकेबाज खेळाडूला संघात केले सामील मात्र, त्या हंगामात शमीने फक्त ६ विकेट्स घेतल्या होत्या आणि त्याचे प्रदर्शन फारसे प्रभावी नव्हते. त्यामुळे, एसआरएच शमीला ट्रेड करून आपल्या पर्समध्ये १० कोटी रुपयांची भर घालू शकते, ज्यामुळे लिलावात त्यांच्याकडे मोठी रक्कम उपलब्ध होईल. हेही वाचा – MS Dhoni : धोनीची धमाकेदार कमबॅक तयारी! निवृत्तीच्या अफवा संपल्या, IPL 2026 साठी रांचीमध्ये गाळतोय घाम मोहम्मद शमीचा आयपीएल प्रवास – मोहम्मद शमीचा आयपीएल प्रवास २०१३ पासून सुरू झाला आहे. त्याने १२ वर्षांत ११९ सामन्यांमध्ये एकूण १३३ विकेट्स मिळवल्या आहेत. विशेषतः, २०२२ आणि २०२३ मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळताना त्याने उत्कृष्ट कामगिरी केली होती (२०२३ मध्ये २८ विकेट्स). सध्या दुखापतीमुळे शमी टीम इंडियातून बाहेर आहे, पण त्याचा अनुभव आणि वेगवान गोलंदाजीची क्षमता पाहता अनेक फ्रँचायझी त्याला घेण्यासाठी उत्सुक आहेत.