मुंबई – बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याचे काही दिवसांपूर्वी मंदिर उभारण्यात होते. लॉकडाऊन दरम्यान गरजू लोकांसाठी सोनू सूदने मोठ्या प्रमाणात मदतीचा हात पुढे केला होता. त्यामुळे अनेकांनी सुनूला देवाची उपमा दिली. यापूर्वी तामिळनाडूमध्ये चाहत्यांनी एमजीआर, खुशबू सुंदर, हंसिका मोटवानी आणि नयनतारा अशा अनेक कलाकारांची मंदिरे उभारली.
View this post on Instagram
दरम्यान, आता या यादीत आणखी एका अभिनेत्रीच्या नावाचा समावेश झाला आहे. नुकतंच 14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी अभिनेत्री ‘निधी अग्रवाल’ हिचे चैन्नईमध्ये एका चाहत्याने मंदिर उभारले आहे. म्हणायला निधी अग्रवालचे तामिळ सिनेसृष्टीत केवळ दोन चित्रपट रिलीज झाले आहेत. आणि तिसरा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. पण चाहते तिच्या अक्षरश: प्रेमात पडले आहेत. आपले मंदिर उभारले हे पाहून खुद्द निधीही हैराण झालीये.
Let’s trend this tag #NidhhiAgerwal #NationalCrushNidhhi#SarkaruVaariPaata #MaheshBabu @urstrulyMahesh pic.twitter.com/htkBqDgOMv
— Hs Nani Dhfm Kovvur (@hsnani1242000) February 14, 2021
निधीने 2017 मध्ये अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. तिने बॉलिवूडमधील ‘मुन्ना माइकल’ या चित्रपटात काम केले. त्यानंतर तिने 2018 आणि 2019 मध्ये काही तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले. ज्यामध्ये ‘सव्यसाची’, ‘मिस्टर मजनू’, ‘आईस्मार्ट शंकर’ या चित्रपटांचा समावेश आहे. आता निधीचे ‘भूमि’ आणि ‘पूनगोडी’ हे तामिळ चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
View this post on Instagram