Cha. Sambhajinagar News : खवड्या डोंगर प्रकरणाला धक्कादायक वळण; आयफोन नव्हे तर.., पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती समोर
Cha. Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावर घडलेल्या दुर्दैवी घटनेत आयफोन १५ मुळे तरुणाने हे पाऊल उचलल्याची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर रंगली होती.

Cha. Sambhajinagar News : खवड्या डोंगरावरील हृदयद्रावक घटनेनंतर तरुणाने आयफोनच्या मागणीवरून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. मात्र, आयफोन हे या घटनेमागचं कारण असल्याचं प्राथमिक तपासात दिसून आलेलं नाही, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. (Cha. Sambhajinagar News)
डीसीपी रत्नाकर नवले यांनी या प्रकरणाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. सोशल मीडियावर आयफोनच्या कारणाची चर्चा होत असली, तरी पोलिसांच्या तपासात त्याला दुजोरा मिळालेला नाही. व्हायरल व्हिडिओतील प्रत्यक्षदर्शी माजी सरपंच संजय जाधव यांनीही मुलाला आयफोन हवा होता, अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. (Cha. Sambhajinagar News)
मुलाकडे आधीपासूनच आयफोन होता
घटनेच्या वेळी संजय जाधव हे कुणालची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी त्यांनी त्याला शांत करण्यासाठी “आयफोन १५ देतो” असं म्हटलं होतं. मात्र, त्याचा अर्थ कुणालला आयफोन हवा होता असा नव्हता. (Cha. Sambhajinagar News)
जाधव यांच्या म्हणण्यानुसार, कुणालकडे आधीपासूनच आयफोन होता. त्यामुळे केवळ आयफोनच्या मागणीमुळे त्याने टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा चुकीची असल्याचं आता स्पष्ट होत आहे. (Cha. Sambhajinagar News)
मग नेमकं कारण काय?
पोलिसांच्या प्राथमिक तपासात कुणालचा वडिलांसोबत वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र हा वाद नेमका कोणत्या कारणावरून झाला, त्यावेळी काय बोलणं झालं आणि कुणालच्या मनात नेमकं काय सुरू होतं, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. (Cha. Sambhajinagar News)
तपास यंत्रणा या सर्व बाबींचा शोध घेत आहे. त्यामुळे आत्महत्येच्या प्रयत्नामागे आयफोनच कारण होतं, असा निष्कर्ष काढणं घाईचं ठरेल, असं पोलिसांच्या स्पष्टीकरणावरून स्पष्ट होतं. (Cha. Sambhajinagar News)

एका चर्चेमागे दडलेलं मोठं दुःख
एका व्हायरल व्हिडिओतील काही सेकंदांवरून आयफोनला या संपूर्ण घटनेचं कारण मानलं गेलं. मात्र, या घटनेमागे एका कुटुंबातील नेमका कोणता संघर्ष होता, याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. (Cha. Sambhajinagar News)





