Chhatrapati Sambhajinagar News : प्रेमप्रकरण की कौटुंबिक कारण? छ. संभाजीनगरातील हृदयद्रावक घटनेमागे नेमकं काय?
Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमधील तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर शुक्रवारी घडलेल्या एका थरारक आणि अत्यंत भीषण दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला.

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरच्या तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर शुक्रवारी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत १८ वर्षीय कुणाल चांदवडे आणि त्याचे आई-वडील मुरलीधर व संगीता चांदवडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कुणाल डोंगरावरून उडी मारण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीय, ग्रामस्थ, पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते. (Chhatrapati Sambhajinagar News)
जाळी धरली, पण तरुणाने दिशा बदलली
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अग्निशामक दलाच्या जवानांनी तरुणाला वाचवण्यासाठी डोंगराच्या पायथ्याशी सुरक्षेची मोठी जाळी पकडून ठेवली होती. मात्र, डोंगराच्या कड्यावर उभा असलेला तरुण सातत्याने आपली दिशा बदलत होता. त्यामुळे त्याचे वडील देखील वर येऊन त्याला विनवणी करत होते. (Chhatrapati Sambhajinagar News)
जवळपास तीन तास कुणालची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते. तो आईशी संवादही साधत होता. मात्र दुपारच्या सुमारास त्याने अचानक डोंगरावरून खाली झोकून दिले. त्याला वाचवण्यासाठी वडील पुढे गेले असता त्यांचाही तोल गेला. त्यानंतर आईनेही डोंगरावरून उडी घेतली. उंचावरून पडल्याने तिघांचाही मृत्यू झाला. (Chhatrapati Sambhajinagar News)
उपस्थितांनी काय सांगितलं?
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, तिसगावच्या माजी सरपंचांने ‘माझा आयफोन १५ घे’ म्हणत आपला मोबाईल देऊ केला. तरी सुद्धा कुणाल चांदवडे हा ऐकण्याच्या मनःस्थितीमध्ये नव्हता. तो वारंवार जागा बदलत होता आणि आईसोबत बोलत होता. आईनेसुद्धा त्याला विनंती केली. मात्र तो काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीन नव्हता. जवळपास तीन तास आम्ही त्याला विनंती करत होतो. (Chhatrapati Sambhajinagar News)
मला मरायचंच आहे
यापुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, वडील त्या मुलाला धरायला गेले. मात्र दोघंही कड्यावरुन खाली कोसळले. हे पाहून त्याच्या आईनेदेखील उडी मारली. तू शिक्षित आहेस, आईकडे बघ. तुझं भविष्य बघ असं त्याला सांगितलं. मात्र त्यानं ऐकलं नाही आणि मला मरायचंच आहे असं तो म्हणत राहिला. (Chhatrapati Sambhajinagar News)
कुणालने टोकाचे पाऊल का उचलले, यामागे प्रेमप्रकरण होते की कौटुंबिक अथवा अन्य काही कारण, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या घटनेमागील नेमके कारण काय, याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे. (Chhatrapati Sambhajinagar News)





