Cha. Sambhajinagar News : अत्यंत दुर्दैवी..! उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू; खवड्या डोंगरावरील घटनेने संभाजीनगर हादरले
Cha. Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर जवळील तिसगाव भागातील खवड्या डोंगरावर शुक्रवारी एक मन हेलावून टाकणारी आणि भीषण दुर्घटना घडली आहे.

Cha. Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये एका मुलासह त्याच्या आई-वडिलांचा डोंगरावरुन पडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. मन सुन्न करणाऱ्या या घटनेने सगळेच जण हादरले आहेत. कुणाल मुरलीधर चांदवडे, मुरलीधर चांदवडे आणि संगीता चांदवडे अशी मृतांची नावे आहेत. हे सर्वजण देवळाई सातारा परिसर येथील असल्याची माहिती समोर आली आहे. (Cha. Sambhajinagar News)
माहितीनुसार, तिसगाव भागातील खवड्या डोंगरावर एक 18 वर्षाचा मुलगा आत्महत्या करायला गेला होता. त्यावेळी त्याचे आई-वडील आणि स्थानिक लोक त्याला वाचवण्यासाठी डोंगरावर गेले. आई-वडील आणि इतर लोक त्या मुलाला उडी मारु नकोस, असे समजावत होते. (Cha. Sambhajinagar News)
मात्र, मुलगा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. वडील आपल्या मुलाची खूप समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. अखेर वडिलांनी पुढे जात मुलाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत मुलाने डोंगरावरुन उडी मारली होती, त्याला पकडण्याच्या प्रयत्नात वडिलांचाही खाली तोल जाऊन तेदेखील खाली पडले. (Cha. Sambhajinagar News)

हे दोघेही डोंगराच्या दरीत खाली पडताच त्यांचा मृत्यू झाला. हा प्रकार पाहून शोक अनावर झालेल्या मुलाच्या आईनेही डोंगरावरुन खाली उडी मारली. त्यामुळे तिचाही मृत्यू झाला. या घटनेने घटनास्थळी उपस्थित असलेल्या सर्वांनाच धक्का बसला. मुलाने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. (Cha. Sambhajinagar News)





