Crime News : धक्कादायक…! धावत्या एसटीमध्ये माथेफिरूकडून तरुणावर प्राणघातक हल्ला; स्वतःवरही केले कोयत्याने वार, घटनेने खळबळ

काटेवाडी : बारामती तालुक्यातील काटेवाडी नजीक बारामती इंदापूर या संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्गावर धावत्या एसटीमध्ये एका जणावर कोयत्याने वार केला व आरोपीने स्वतःवरही वार करण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती डॉ. सुदर्शन राठोड यांना समजले असता त्यांनी तातडीने वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डूणगे यांना या घटनेबाबत माहिती देऊन या घटनेचे गांभीर्य ओळखून आदेश दिल्याने वालचंदनगर पोलिसांनी तातडीने जाऊन वार करणाऱ्या तरुणाला शिताफीने पकडून बारामती पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
बारामती इंदापूर या बसमध्ये हा प्रकार घडला. बस धावत असतानाच काटेवाडी नजीक आली असता हा प्रकार घडला. यामध्ये एका जणावर कोयत्याने वार करण्यात आले. बारामती तालुक्यातील काटेवाडी या ठिकाणी एसटी आली असता हा सगळा प्रकार घडला. यामध्ये एक युवक गंभीर जखमी झाला असून कोयत्याने वार करणाऱ्या हल्लेखोरने स्वतःवरही वार केले. त्यामुळे बसमधील प्रवासी भयभीत झाले होते. काटेवाडी या ठिकाणी बस थांबवली असता यातील आरोपी कोयता घेऊन खाली उतरला असता पुलावरून निघाला, त्यावेळी वालचंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार शैलेश स्वामी, अजित थोरात, परिमल मानेर, विजय मदने, सतीश फुलारे हे घटनास्थळी पोहचले.
त्यावेळी पोलीस हवालदार शैलेश स्वामी यांनी धाडस दाखवून आरोपीस बोलण्यामध्ये गुंतवून त्याचे नजर चुकवून त्याच्यावर झडप टाकली. त्यावेळी इतर सर्व पोलिसांनी पाठीमागून या आरोपीला जोरात मिठी मारल्याने आरोपी जागेवर पोलिसांच्या ताब्यात मिळाला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेमुळे मात्र बसमधील प्रवासी व स्थानिक नागरिक देखील भयभीत झाले होते. अशा प्रकारे हातात कोयता घेऊन जर कोणी कोणाला मारण्याचा प्रयत्न करत असेल तर आरोपींना भय राहिले नाही असेच यावरून दिसून येत आहे
याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून या घडलेल्या घटनेने मात्र अनेकांना धक्का बसला आहे. हल्लेखोर व जखमीची ओळख अद्याप समजलेले नसून यासंदर्भात पोलिसांकडून माहिती घेण्याची काम सुरू आहे. ही घटना घडली असता वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अतिशय चांगली कामगिरी केली व स्वतःचे जीव धोकत घालून आरोपीस पकडले. याबद्दल वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांचे कौतुक होत आहे.





