मागील काही दिवसांपासून पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक आणि भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा यांच्या घटस्फोटाबाबत चर्चा मोठा प्रमाणात सुरु होत्या. दोघांच्याही सोशल मीडियावरील पोस्ट आणि वर्तनामुळे त्यांच्या घटस्पोटाच्या चर्चांना उधाण आले होते. त्याचबरोबर त्यांच्या काही जवळच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी देखील ते दोघे घटस्फोट घेणार असल्याचे म्हटले होते. याबाबतच्या अनेक बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या. त्यांनतर काही दिवसांमध्ये सानिया आणि शोएब यांनी त्यांच्या ‘द मिर्झा मलिक शो’ नावाच्या शोची घोषणा केली. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाबाबत आणखीच संभ्रम निर्मण झाला.
BCCI | आयपीएलवर ताशेरे ओढणारा खेळाडूच होणार आता बीसीसीआय निवड समितीचा अध्यक्ष!
दरम्यान, शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांच्या घटस्फोटाबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्याचबरोबर दोघांनीही घटस्पोटबाबतच्या विषयावर बोलणे अनेकवेळा टाळले आहे. मात्र, आता शोएबने या विषयावर बोलताना स्पष्टच प्रतिक्रिया दिलेली आहे. शोएब मलिकने एका न्यूज पोर्टलला सांगितले की, ही त्यांची वैयक्तिक बाब आहे आणि ती दोघांवर सोडली पाहिजे. शोएबने या वक्तव्याद्वारे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, या संपूर्ण प्रकरणात मीडियाचा हस्तक्षेप असल्याचे आवडत नाही. शोएबने असेही सांगितले की, सानिया आणि तो त्यांच्या विभक्त होण्याच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देणार नाही. वृत्तानुसार, शोएब मलिक आणि सानिया मिर्झा विविध शोसाठी केलेले करार आणि कायदेशीर गोष्टींमुळे घटस्फोटाबाबत अधिकृत वक्तव्य देत नाहीत.
BCCI | आयपीएलवर ताशेरे ओढणारा खेळाडूच होणार आता बीसीसीआय निवड समितीचा अध्यक्ष!
मागील काही दिवसांपूर्वी सानिया मिर्झाने तिच्या इंस्टाग्राम खात्यावर तिचा मुलगा इझानसोबतचा फोटो शेअर करत भावनिक पोस्ट लिहिली होती. त्यामुळे सानिया आता शोएबसोबत घटस्फोट घेण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात होते. त्याचबरोबर सानिया मिर्झाने इतरही काही भावनिक पोस्ट आणि स्टोरीज तिच्या सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. त्यामुळेच माध्यमांमध्ये त्यांच्या घटस्फोटाबाबतच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.
सानिया आणि शोएब यांचे २०१० मध्ये लग्न झाले होते. त्यानंतर ३० ऑक्टोबर २०१८ रोजी त्यांना इझान हा मुलगा झाला होता. मुळात या दोघांच्या घटस्फोटबाबतच्या चर्चांना शोएब यालाच कारणीभूत मानले जात आहे. कारण शोएब मलिकचे प्रसिद्ध पाकिस्तानी मॉडेल आणि अभिनेत्री आयशा उमरसोबत अफेयर असल्याचे पाकिस्तानी मीडियाने म्हटले होते. ज्याची माहिती सानियाला मिळाली. या वर्षाच्या सुरूवातीला शोएब आणि आयशा यांचे फोटो देखील व्हायरल झाले होते.