Sania Mirza vs Shoaib Malik : सानिया मिर्झाचा मुलगा इजहानने सोडली शाळा, समोर आले ‘हे’ कारण…

नवी दिल्ली – भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाचा घटस्फोट आणि शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नानंतर तिचा ५ वर्षांचा मुलगा इजहान मिर्झा मलिकला याचा फटका बसल्याचे दिसत आहे. पाकिस्तानी पत्रकार नईम हनीफने नुकतेच समा टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सानियाशी बोलल्याचा दावा केला होता. हनीफच्या म्हणण्यानुसार, इजहानचा त्याच्या शाळेत इतका छळ केला जात आहे की त्याने शाळेत जाणे बंद केले आहे.
नईम म्हणतात की, सानियाने तिचा मुलगा इजहानच्या मानसिक आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केली आणि त्याच्या वडिलांच्या तिसऱ्या लग्नाशी संबंधित बातम्या त्याला मानसिकदृष्ट्या त्रास देत असल्याचे उघड केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सानिया आता तिच्या मुलाला घेऊन मूळ गावी हैदराबादला परतली आहे.
शुक्रवारी सानियाने तिचा मुलगा आणि तिची बहीण अनम मिर्झाची मुलगी दुआ यांचा एक फोटो सोशल मीडिया पोस्टमध्ये शेअर केला आणि त्यांना तिची ‘लाइफलाइन’ असे म्हटले होते.
SL vs AFG Test : ‘मॉनिटर लिजर्ड’मुळे थांबला सामना, खेळाडूंसह पंचानीही घाबरून ठोकली धूम, पाहा Video….
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिकने दोन आठवड्यांपूर्वी तिसरे लग्न केले. ४१ वर्षीय शोएबने ३० वर्षीय पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले. शोएबने सनासोबतचा एक फोटो शेअर करून ही माहिती दिली होती.
शोएबचे पहिले लग्न आयेशा सिद्दीकीसोबत झाले होते. घटस्फोट घेतल्यानंतर त्याने २०१० मध्ये माजी भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाशी लग्न केले. सानियाच्या वडिलांनी सांगितले की, त्यांची मुलगी ‘खुला प्रथा’ अंतर्गत शोएबपासून वेगळी झाली होती.





