सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमी करणार लग्न? टेनिस स्टारच्या वडिलांची प्रतिक्रिया वाचा-

sania mirza –सोशल मीडियावर दररोज अनेक अफवा वाचायला मिळतात. टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमी विवाहबंधनात अडकू शकतात, असा दावा अलीकडे केला जात होता. ही बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरू लागली. मात्र आता या प्रकरणांवर सानिया मिर्झाच्या वडिलांचे वक्तव्य समोर आले आहे.
काही काळापूर्वी सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांचा घटस्फोट झाला. मोहम्मद शमीही पत्नीपासून वेगळे होण्याच्या वाटेवर आहे. इंटरनेटवरील काही युजर्सनी सानिया आणि मोहम्मद शमीच्या नात्याबद्दल बोलायला सुरुवात केली होती. त्यावर प्रतिक्रिया देत सानियाचे वडील इम्रान यांनी हे पूर्ण पणे खोटे असल्याचे म्हंटले आहे.
सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमीवर प्रतिक्रिया –
एनडीटीव्हीशी बोलताना त्यांनी आपल्या मुलीबद्दल प्रतिक्रिया दिली. या अफवांवर ते म्हणाले, ‘हे सर्व मूर्खपणाचे आहे. ती मोहम्मद शमीला भेटलेलीही नाही. सानिया आणि शमीबद्दल सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चा पूर्णपणे खोट्या आहेत.
सानिया मिर्झाच्या माजी पतीने तिसरे लग्न केले –
सानिया मिर्झापासून घटस्फोट घेतल्यानंतर शोएब मलिकने तिसरे लग्न केल्याची माहिती आहे. पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत त्याने तिसरे लग्न केले. सानियाने घटस्फोटानंतर अद्याप लग्न केले नाही. ती आपला मुलगा आणि कुटुंबासह आयुष्य जगत आहे. घटस्फोटानंतर पाच महिन्यांनी ती हज यात्रेलाही निघून गेली.
लग्न कधी झाले होते –
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी 2010 मध्ये लग्न केले होते. त्यावेळी या लग्नाची पाकिस्तान आणि भारतात खूप चर्चा झाली होती. त्यावेळी हैदराबाद आणि लाहोरमध्ये अनेक मेजवानी होत असत. लग्नानंतर दोघेही दुबईत राहत होते. शोएब आणि सानियाला एक मुलगाही आहे जो आता सानियासोबत राहतो.





