पाचगणी (प्रतिनिधी)- किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनासाठी २५ कोटी रुपये देत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रतापगडावरील शिवप्रतापदिनाच्या कार्यक्रमात केली.
छत्रपती शिवरायांचा इतिहास तरुणाईला प्रेरणा देणारा आहे , गडकोट किल्ल्याच सवर्धन इतिहासाचा ठेवा जतन करताना . किल्ले प्रतापगडाच्या सवंर्धनाकरीता २५ कोटींची तरतूद शिंदे फडणवीस सरकारकडुन करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
#किल्ले प्रतापगडच्या संवर्धनासाठी 25 कोटी रुपयांचा निधी तात्काळ देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे#शिवप्रतापदिन pic.twitter.com/aDPPIFi3OO
— DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA (@Info_Satara) November 30, 2022
दरम्यान, शिवकालीन धाडशी खेळाने व शिवमय वातावरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत किल्ले प्रतापगड ता. महाबळेश्वर येथे शिवप्रताप दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी किल्ले प्रतापगड येथील बुरुजावरील शिवशाहीचे प्रतीक असलेल्या भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
तसेच यावेळी किल्ले प्रतापगडावर अण्णासाहेब कल्याणी शाळेची दिव्यांग विद्यार्थीनी शाहीर पियुषी भोसलेने शिवप्रताप दिनाचा पोवाडा सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. रोमहर्षक, भारदस्त पोवाड्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिचे कौतुक करून विशेष सत्कार केला.