Maharashtra Assembly Election 2024 : स्वत: CM शिंदे ते अभिनेता गोविंदा-शरद पोंक्षे; शिवसेनेच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर…

Maharashtra Assembly Election 2024 : – विधानसभा निवडणूक 2024 ची धामधूम सर्वत्र सुरू आहे. प्रत्येक पक्षाने आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे यातच आता शिवसेना (शिंदे) पक्षाने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. यात स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde), अभिनेता गोविंदा, अभिनेते शरद पोंक्षेंसह (Sharad Ponkshe) मंत्री दीपक केसरकर आदींचा समावेश आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी !#Shivsena #Eknathshinde pic.twitter.com/LCJt8i8ojh
— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) November 4, 2024
विधानसभा निवडणूकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून आजपासून ख-या अर्थाने प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत. या प्रचारात विरोधक सत्ताधारी एकमेकांची उणीदुणी काढताना दिसणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह रामदास कदम, गजानन कीर्तिकर, आनंदराव अडसूळ, नीलम गोऱ्हे या ज्येष्ठ नेत्यांची फौज उतरवण्यात आली आहे.
Sharad Pawar : “आता त्या कोणत्याही पदावर असू नये…”; रश्मी शुक्लांच्या बदलीवर शरद पवार स्पष्टच बोलले
यासोबतच शिंदे-फडणवीस महायुती सरकारच्या काळात मंत्रिपद भूषवलेले गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, दीपक केसरकर, उदय सामंत यांचाही समावेश आहे. याशिवाय राजू वाघमारे, अक्षय महाराज भोसले, तेजस्विनी केंद्रे यासारख्या नव्या चेहऱ्यांनाही स्थान देण्यात आले आहे.





