मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत शिवसेनेच्या बड्या नेत्याने नाव केले स्पष्ट; म्हणाले…

Maharashtra Assembly Election 2024 | राज्यातील विधानसभा निवडणूकांचे मतदान पार पडले असून येत्या 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. यादरम्यान आता महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांकडून मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्य केली जात आहे. शिंदेसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री पदाबाबत भाष्य केले आहे. ‘एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून लोकांनी कल दिला आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होतील असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे.
राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केला. ‘एक्झिट पोलवर सर्व अंदाज पाहणे योग्य नाही, निकाल बाहेर येऊ द्या. आमच्यात भाजप मोठा भाऊ दिसत आहे, पण आम्ही सख्खे भाऊ आहेत असंही ते म्हणाले. आम्हाला इतरांची गरज पडणार नाही, गरज पडल्यास अपक्ष सोबत घेऊ असेही शिरसाट म्हणाले.
कोणत्याही निवडणुकीत अपक्षांची संख्या ही 20 पर्यंत असते, ते कोण असतात तर ते बंडखोर असतात. त्यामुळे ते सत्ता येणाऱ्यांसोबत कल देत असतात. जर आम्हाला दोन चार अपक्षांची गरज पडली तर ते आमच्यासोबत येतील. अपक्ष आमच्या संपर्कात असल्याचे शिरसाट म्हणाले.
‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनतील, असा आम्हाला विश्वास ‘
संजय शिरसाट म्हणाले, निकालानंतर महायुतीचे नेते एकत्रित बसून ठरवणार आहेत की मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार आहे. परंतु आम्हा सर्वांना आणि राज्यातील सामान्य नागरिकांना वाटते शिंदे साहेब मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील. शिंदे साहेब मुख्यमंत्री बनतील, असा आम्हाला विश्वास आहे. वाढलेल्या मतांचा फायदा महायुतीला होईल.
तसेच यंदाच्या निवडणुकीय वोट जिहादचा मुद्दा चर्चेत आला आहे. यावर शिरसाट यांनी विरोधकांवर टीका केली आहे. त्यांचा व्होट जिहाद सुरू होता आणि आम्ही आमच धर्मयुध्द लढत होतो. आमचं धर्मयुध्द, बटेंगे तो कटेंगे, एक हैं तो सेफ हैं यशस्वी झाल्याचे यावेळी शिरसाट यांनी सांगितले आहे.
हेही वाचा :
झारखंडमध्ये कोणाची येणार सत्ता? एक्झिट पोलद्वारे माहिती समोर…





