Satara : वाई तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी 25 कोटीचा निधी : खा. नितीन पाटील

वाई : वाई तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते लोकांच्या सोयीस्कर व्हावेत व दळणवळण सुरळीत व्हावे यासाठी केंद्रीय राखीव निधीतून तीन कामांच्या रस्त्यांसाठी 25 कोटी निधी मंजूर केल्याची माहिती खासदार नितीन पाटील यांनी दिली.
वाई, ग्रामीण भागातील वाहतूकीची सुविधा अधिक सुरळीत व्हावी ,ग्रामीण भागातील लोकांच्या दळणवळणाचा मार्ग सुखर व्हावा यासाठी वाई तालुक्यातील काही खराब झालेले रस्ते चांगले बनविण्यासाठी खासदार नितीन पाटील यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करुन हा निधी उपलब्ध् करुन घेतला आहे.
यामध्ये किसनवीर कारखाना पाठीमागील बाजुचा किकली फाटा ते राऊतवाडी रस्त्यांमधील लांबीची सुधारणा करणे व नवीन पुलांचे बांधकाम करणे यासाठी 5 कोटी तर धोम फाटा ते जांभळी रस्ता रुंदीकरण व नवीन पुलांचे बांधकाम करणे यासाठी 10 कोटी, तसेच बलकवडी फाटा ते जोर हा रस्ता सन 2021 मधील अतिवृष्टीमध्ये मोठया प्रमाणात खचलेला होता तसेच या रस्त्यावरील मो-याही वाहुन गेल्यामुळे या रस्त्याचे आता नव्याने नुतनीकरण डांबरीकरण याकामासाठी 10 कोटी निधी उपलब्ध होणार आहे.
या सदर रस्त्यामुळे पश्चिम भागातील जनतेचा वहातुकीचा प्रश्न कायमस्वरुपी मिटण्यास मदत होणार आहे.





