पिंपरी | कृष्णराव भेगडे स्कूलमध्ये शिवजयंती साजरी

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व पालखीचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक चंद्रकांत काकडे, अध्यक्ष संदीप काकडे, खजिनदार गौरी काकडे, मंगलाताई काकडे, सुप्रिया काकडे व सोनल काकडे, मुख्याध्यापिका मीना अय्यर, पर्यवेक्षिका ज्योती सावंत, रमा बागुल, कीर्ती कुलकर्णी व मीरा चव्हाण उपस्थित होत्या.
इयत्ता पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांनी शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यसाठी कोणत्या संघर्षाचा सामना केला, यावर आधारित नाटक सादर केले. त्यानंतर पोवाडाही सादर केला.
त्यानंतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य या विषयावर मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करून ढोल ताशांच्या गजरात शिवाजी महाराजांची पालखी काढली. यावेळी ‘हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा दिल्या.




