Rahul Gandhi : शिवजयंतीच्या शुभेच्छा देताना राहुल गांधीकडून झाली ‘ही’ मोठी घोडचूक; पोस्ट व्हायरल

छत्रपती शिवाजी महाराजांची आज 395 वी जयंती असून संपूर्ण राज्यात ती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. शिवजयंतीनिमित्त अनेक मोठ्या नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनीही आपल्या एक्स (आधीचं ट्विटर) अकाऊंटवरुन शिवजयंतीसंदर्भात पोस्ट केली. मात्र राहुल गांधींनी त्यांच्या पोस्टमध्ये वापरलेल्या एका शब्दावरुन अनेकांनी आक्षेप घेतला आहे. यामुळे राहुल गांधींवर टीका केली जात आहे.
छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती पर उन्हें सादर नमन और अपनी विनम्र श्रद्धांजलि अर्पित करता हूं।
अपने साहस और शौर्य से उन्होंने हमें निडरता और पूरे समर्पण के साथ आवाज़ उठाने की प्रेरणा दी।
उनका जीवन हम सभी के लिए सदैव प्रेरणास्रोत रहेगा। pic.twitter.com/1jOCYOkrC1
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 19, 2025
काय लिहिले पोस्टमध्ये?
राहुल गांधींनी आपला एक जुना फोटो पोस्ट करत शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्यात. या फोटोमध्ये राहुल गांधी शिवरायांची पूर्णकृती मूर्ती हातात धरुन उंचावून दाखवताना दिसत आहेत. हा फोटो पोस्ट करताना राहुल गांधींनी, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना नमन करतो आणि मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आपलं शौर्य आणि साहसाने त्यांनी आपल्याला निर्भिडपणा आणि पूर्ण समर्पणाने आवाज उठवण्याची प्रेरणा दिली. त्यांचं आयुष्य आपल्या सर्वांसाठी कायमच प्रेरणास्रोत राहील, असं राहुल गांधींनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे.
‘त्या’ शब्दावर घेतला आक्षेप
राहुल गांधीनी शिवरायांच्या जन्मदिनी त्यांना ‘श्रद्धांजली अर्पण करतो’ असा उल्लेख आपल्या पोस्टमध्ये केला. अनेकांनी यावर आक्षेप घेतला. सामान्यपणे जयंतीनिमित्त केल्या जाणाऱ्या पोस्टमध्ये आदरांजली असा उल्लेख करतात. श्रद्धांजली हा शब्द पुण्यतिथीच्या संदर्भातून वापरला जातो. असं असताना राहुल गांधींनी जयंतीच्या दिवशी हा शब्द पोस्टमध्ये वापरल्यामुळे त्यांच्या पोस्टवर आक्षेप घेतला जात आहे.





