महाबळेश्वर येथे शिवजयंती उत्साहात साजरी

महाबळेश्वर – शिवजयंती उत्सव समिती महाबळेश्वर यांच्या वतीने महाबळेश्वर मध्ये तिथीनुसार १७ मार्च रोजी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक, प्रतापसिंह उद्यान, अंबिका सोसायटी, कोळे आळी येथील छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात शिवजयंती उत्सव समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनिरुद्ध धोत्रे, उपाध्यक्ष प्रितेश भिसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी अभिजित कानडे, संजय ओंबळे, विजय नायडू, आकाश साळुंखे, श्रीकांत जांभळे, नाना कदम, गणेश भोसले, ओंकार येवले, स्वरूप देवकर, ऋषी खोत, गणेश ढेबे, सुशांत पारठे, तसेच शिवजयंती उत्सव समितीचे सभासद याचबरोबर नगर परिषदेचे आबाजी ढोबळे, सचिन कदम, संतोष धड व कर्मचारी तर वनविभागाचे संतोष कदम, प्रताप यादव, गणेश दानवले आदी मान्यवर उपस्थित होते.



