Shiv Thakare : बिग बॉस विनर ‘शिव ठाकरे’च्या घराला भीषण आग.! अभिनेता थोडक्यात बचावला, Video पाहा….

Shiv Thakare : ‘बिग बॉस मराठी’ सीजन 2 चा विनर आणि अभिनेता शिव ठाकरे अल्पावधीत प्रसिद्ध झाला. मराठीनंतर शिवला हिंदीमध्ये अमाप प्रसिद्धी मिळाली. आता तो हिंदी इंडस्ट्रीमध्येच अधिक सक्रिय असतो. काही काळापूर्वीच त्याने मुंबईत स्वतःचं घर घेतलं. पण आज 18 नोव्हेंबरला त्याच्या घराला अचानक आग लागली आहे. या आगीत शिवचे संपूर्ण घर जळून राख झाले आहे.
आग विझवल्यानंतरचा शिवच्या घरातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अग्निशमन दलाची टीम घरात आग लागण्याच्या कारणांचा शोध घेताना आणि आवश्यक ती कारवाई करताना दिसत आहे. कोल्टे पाटील व्हर्व्ह बिल्डिंगमधील घरात ही आग लागली होती. सध्या याचे व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे. आग लागण्याचं कारण अद्याप समजू शकलं नाहीये.
View this post on Instagram
दरम्यान, काल रात्रीच शिव ठाकरे बाहेरगावहून मुंबईत परत आला होता आणि आज सकाळी ही घटना घडली. शिव ठाकरेच्या टीमनेही या घटनेबाबत एक निवेदन जारी केले आहे. अधिकृत नोटमध्ये त्यांनी लिहिले आहे, ‘@shivthakare9ला आज सकाळी एका अपघाताचा सामना करावा लागला. कारण कोल्टे पाटील व्हर्व्ह बिल्डिंगमधील त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी आग लागली.
अभिनेत्याला कोणतीही दुखापत झालेली नाही, पण घराला मात्र याची झळ बसली आहे!’ घटनेच्या वेळी शिव ठाकरे मुंबईत नव्हते आणि कालच ते शहरात परतले आहेत. त्याने आपल्या इंस्टाग्रामवर विमानतळावरून एक फोटो शेअर करत लिहिले, ‘मुंबई वापस’ असे म्हटले होते. झलक दिखला जा हा शो करत असतानाच शिवने हे घर विकत घेतलं होतं. गृहप्रवेशावेळी त्याचे अनेक सेलिब्रिटी मित्र घरी आले होते.





