Manchar News : रात्री १० नंतर प्रचाराला ‘ब्रेक’! सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर; उमेदवारांना कडक सूचना

प्रभात वृत्तसेवा
मंचर – आंबेगाव तालुक्यातील मंचर नगरपंचायत निवडणुकीदरम्यान शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच रात्री 10 पर्यंतच प्रचार करता येईल. सभा, मिरवणुका आयोजित करण्यासाठी किमान 48 तास आधी आणि जास्तीत जास्त पाच दिवस आधी परवानगी घेणे अनिवार्य आहे, असे आवाहन मंचर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी केले.
मंचर नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रिया तसेच आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याबाबत मार्गदर्शन केले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ म्हणाले उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत सूचना दिल्या. तसेच शांततेत व पारदर्शीपणे निवडणूक पार पाडण्यासाठी सर्व स्तरावरून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
सोशल मीडियाचा वापर करताना जातीय, धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. वाद, एकमेकांना आव्हान देणारे संदेश प्रसारित करू नयेत. उमेदवारांनी स्वतःच्या कार्यकत्यांना अशा प्रकारच्या गैरवर्तनापासून परावृत्त करण्याचे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी केले आहे.





