Maharashtra Politics : ठाकरेंची साथ सोडलेल्या खासदारांना मोठा धक्का? ‘या’ एका चुकीमुळे अपात्रतेची टांगती तलवार?
Maharashtra Politics : ठाकरे गटाच्या ६ खासदारांच्या या पक्षांतरावर 'अपात्रतेची टांगती तलवार' असल्याचा दावा ठाकरे गटाचे मुख्य प्रतोद अनिल देसाई यांनी केला आहे.

Maharashtra Politics : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला असला, तरी त्यांच्या अपात्रतेचा मुद्दा आता पुन्हा चर्चेत आला आहे. या खासदारांवर कारवाई होऊ शकते, असा दावा ठाकरे गटाचे मुख्य प्रतोद अनिल देसाई यांनी केला आहे. (Maharashtra Politics)
सहा खासदारांच्या पक्षांतरानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे ‘ऑपरेशन टायगर’ पूर्णपणे यशस्वी झाल्याचा दावा केला होता. ठाकरे गटाच्या ९ पैकी ६ खासदारांनी पक्ष सोडल्याने दोन-तृतीयांश संख्याबळ पूर्ण होत असल्याने कायदेशीर अडचण येणार नसल्याचे शिंदे गटाचे म्हणणे आहे. (Maharashtra Politics)
मात्र, या घडामोडींनंतर ठाकरे गटाचे लोकसभा गटनेते अरविंद सावंत आणि मुख्य प्रतोद अनिल देसाई यांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. जवळपास ३५ मिनिटांच्या चर्चेनंतर देसाई यांनी मोठा दावा करत बंडखोर खासदारांनी दहाव्या अनुसूचीतील (Anti-Defection Law) तरतुदींचे उल्लंघन केल्याचे म्हटले. (Maharashtra Politics)
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? दिल्लीतून मोठी अपडेट समोर
अनिल देसाई म्हणाले की, “दोन-तृतीयांश खासदारांनी वेगळा गट स्थापन केला असला तरी मूळ राजकीय पक्ष कोणत्याही दुसऱ्या पक्षात विलीन झालेला नाही. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हा स्वतंत्र पक्ष अस्तित्वात आहे. त्यामुळे या खासदारांना पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाण्याचा घटनात्मक अधिकार मिळत नाही.” (Maharashtra Politics)
ते पुढे म्हणाले की, “हे सर्व खासदार मशाल चिन्हावर निवडून आले आहेत आणि लोकसभेच्या नोंदींमध्ये ते शिवसेना ठाकरे पक्षाचे सदस्य म्हणून नोंदलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर पक्षांतरबंदी कायद्याच्या सर्व तरतुदी लागू होतात.” (Maharashtra Politics)

From left to right: Sanjay Jadhav, Sanjay Deshmukh, Nagesh Patil Ashtikar, Bhausaheb Wakchaure, Sanjay Dina Patil, and Omraje Nimbalkar.
लोकसभा अध्यक्षांनीही संविधानातील दहाव्या अनुसूचीतील तरतुदींची नोंद घेतल्याचा दावा देसाई यांनी केला. त्यामुळे आता या प्रकरणात लोकसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics)
दरम्यान, शिंदे गटाने सर्व प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत राहून पूर्ण केल्याचा दावा कायम ठेवला आहे. त्यामुळे सहा बंडखोर खासदारांच्या भवितव्याबाबतचा अंतिम निर्णय आता लोकसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर अवलंबून असणार आहे. (Maharashtra Politics)
Omraje Nimbalkar : उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर! शिवसेनेत प्रवेश करताच ओमराजेंना पहिला मोठा धक्का





