Bacchu Kadu : बच्चू कडूंना मोठी लॉटरी? एकनाथ शिंदेंकडून मोठं बक्षीस मिळणार?
Bacchu Kadu : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या एका मोठ्या पुनर्वसनाची आणि नव्या राजकीय समीकरणाची चर्चा रंगली आहे.

Bacchu Kadu : राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी सुरू असतानाच आमदार बच्चू कडू यांच्याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून त्यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Bacchu Kadu)
अलीकडेच विधानपरिषदेच्या निवडणुकीत बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता त्यांना राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं पद मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या विधानपरिषदेचे उपसभापतीपद रिक्त असून या पदावर नियुक्तीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. (Bacchu Kadu)
शिवसेनेच्या कोट्यातील हे पद माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर रिक्त झाले आहे. गोऱ्हे यांना पुन्हा विधानपरिषदेवर संधी देण्यात आल्याने त्या पुन्हा उपसभापती होतील का, याबाबत चर्चा होती. मात्र आता बच्चू कडू आणि नंदुरबारचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची नावेही शर्यतीत असल्याची माहिती समोर आली आहे. (Bacchu Kadu)
दरम्यान, सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात उपसभापतीपदाची निवड होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी स्वतंत्र एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलावून निवडणूक घेण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Bacchu Kadu)
त्यामुळे विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. बच्चू कडूंना ही मोठी संधी मिळते का, याबाबत उत्सुकता वाढली आहे. (Bacchu Kadu)






