Shiv Sena Hearing : मूळ राजकीय पक्षातच उभी फूट; शिंदे गटाचा सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तीवाद
Shiv Sena Hearing : शिवसेना पक्ष आणि 'धनुष्यबाण' चिन्हाबाबतच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू असून, शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांनी जोरदार युक्तीवाद मांडला.

Shiv Sena Hearing : संविधानाच्या कलम 324 अन्वये निवडणूक आयोगाला व्यापक व सर्वोच्च अधिकार प्राप्त आहेत. पक्षाची घटना लोकशाही तत्त्वांनुसार आहे की, केवळ मर्जीतील नियुक्त्यांवर आधारलेली आहे, हे तपासण्याचा पूर्ण अधिकार निवडणूक आयोगाला आहे. (Shiv Sena Hearing)
आयोग एखाद्या दिवाणी न्यायालयाप्रमाणे काम करत नसला, तरी पक्षाची घटना, संघटनात्मक रचना आणि विधिमंडळ पक्ष या तिन्ही निकषांची तपासणी करण्याचा अधिकार आयोगाकडे अबाधित आहे. (Shiv Sena Hearing)
त्यामुळे आमचा खटला केवळ विधिमंडळ पक्षातील फुटीपुरता मर्यादित नाही, तर मूळ राजकीय पक्षातच उभी फूट पडली आहे. आमच्या दोन गटांपैकी खरी शिवसेना कोणती? हाच मूळ प्रश्न आहे, असा युक्तीवाद शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांनी केला. (Shiv Sena Hearing)
सरन्यायाधीश सूर्यकांत, न्या. जॉयमाल्य बागची आणि न्या. व्ही. मोहना यांच्या खंडपीठसमोर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत अंतिम सुनावणी सुरू आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी ठाकरे गटाच्या बाजूने युक्तीवाद पूर्ण केला असून शिवसेना शिंदे गटाकडून नीरज किशन कौल युक्तीवाद करत आहेत. (Shiv Sena Hearing)
नीरज कौल यांनी युक्तीवाद करताना नमूद केले की, या प्रकरणातील संपूर्ण अधिकृत रेकॉर्ड न्यायालयाने तपासणे आवश्यक आहे. कारण ठाकरे गट ज्या 2018 च्या पक्षघटनेचा आधार घेत आहे, ती घटना कधीही निवडणूक आयोगाकडे रीतसर नोंदणीकृत नव्हती. (Shiv Sena Hearing)
तसेच निवडणूक आयोगासोबत झालेल्या सविस्तर पत्रव्यवहारानंतर शिवसेनेची 1999 ची घटना अस्तित्वात आली होती, त्यामुळेच आयोगाने निर्णय घेताना त्याच अधिकृत घटनेचा विचार केला. (Shiv Sena Hearing)
याचा अर्थ निवडणूक आयोगाने पक्षात काय दुरुस्ती व्हावी हे ठरवले नाही, तर पक्षाची रचना खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांच्या इच्छेचे प्रतिनिधित्व करते का? हे तपासले. पक्षात मोठ्या प्रमाणावर निवडणुकांऐवजी तदर्थ आणि नामनिर्देशित नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. (Shiv Sena Hearing)
अशा बिननिवडणुकीच्या नियुक्त्यांमुळे पक्षाची रचना तळागाळातील कार्यकर्त्यांची मर्जी दर्शवत नाही, असा आक्षेप त्यांनी घेतला. दरम्यान, पुढील सुनावणी उद्या बुधवारी होणार आहे. (Shiv Sena Hearing)





