Nagar | श्रीरामपूर विधानसभेची जागा शिवसेनेला घ्या – भगत

श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- आगामी विधानसभा निवडणूकीत श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला सेनेला उमेदवारी देण्यात आली तर विजय निश्चित आहे.
त्यामुळे या मतदार संघातून शिवसेनेने उमेदवारी घ्यावी,अशी मागणी श्रीरामपूर तालुका प्रमुख लखन भगत यांनी शिवसेना नेते खा.अरविंद सावंत यांच्याकडे केली.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना नेते खा.अरविंद सावंत शिर्डी येथे आले असता तालुकाप्रमुख भगत व इतर सेना कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे मागणी केली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे उपस्थित होते.
श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानणारा मतदार आहे. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार दिल्यास निश्चित मोठ्या मताधिक्क्याने निवडून येईल, अशी ग्वाही भगत यांनी दिली.
याप्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अशोकराव थोरे, माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे, शेखर दुबय्या, सदाशिव कराड, सुधीर वायखिंडे, विक्रम नाईक, रफिक शेख, विजय बडाख, प्रदीप मोहिते,
संजय साळवे, सुरेश थोरे, सिद्धांत छल्लारे, मुस्ताक शेख, कैलास आवटी, संजय परदेशी, युवती सेनाप्रमुख नेहा लुंकड, सागर शिरसाठ, प्रमोद टाकसाळ, नितीन शिंदे, रवींद्र थोरात, कैलास पुजारी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.





